गेले ६ -७ दिवस महाराष्ट्रातले सर्व प्रश्न संपले होते . बायका पोरींनी हंडा घेऊन किलोमीटर भर उन्हात पाण्यासाठी जाणे संपले होते , शेतकरी आनंदित झाले होते, गुन्हेगारांनी सर्व गुन्हे बंद करायचे ठरवले होते. मात्र एक यक्ष प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला होता. आणि " निरपेक्ष , निस्वार्थी " म्हणून लौकिक असलेल्या आमच्या मिडिया ने त्याचा " सवाल दस करोड " का केलं करून ठेवला होतं. तो प्रश्न म्हणजे बिहार अधिपती नितीश कुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिन साजरा करावा अगर करू नये... आता मुंबईतल पान ( आणि TRP ) नवीन वाघाच्या डरकाळी वर हलत असल्यामुळे सर्व कॅमेरे , माईक चे दांडे दादरच्या गुहेच्या दिशेने रोखले होते. मात्र वाघ काहीच प्रतिक्रिया देत नसल्यामुळे गुहेतून येणारे वेगवेगळे आवाज , प्रतिध्वनी प्रमाण मानून मिडिया ने जाहीर केले ..... आता १५ तारखेला राडाच... जणू महायुद्धच येउनी ठेपले... सध्या वादाला रंग लाऊन दोन राज्यातील युद्ध बनवायचे आणि नंतर 'एक देश' ची टेप लावायची...मिडीयाला हे छान जमत..
दृश्य क्रमांक एक ...
मराठी बातम्यांची स्वयंघोषित नंबर १ वाहिनी ( म्हणजे आम्हीच कसे नंबर १ याचा दावा करणाऱ्या ३-४ वाहिन्यांपैकी एक)
काल पूर्ण " राज"कीय सभा " जिवंत " दाखवल्यामुळे आपलाच कसा TRP वाढला ह्याची खमंग चर्चा चालू असतानाच १५ ला कसे तय्यार राहायचे ह्याची तय्यारी सुरु झाले.
"तू दादर मध्ये थांब, चार पाच तोडफोडीचे shots घे "
" तू बांद्र्याच्या किल्ल्यावर बघ काय हालचाल होतेय..."
" खल फटाक झाली कि तेच rewind forward करून दिवसभर दाखवा "
" मग मुंबई 'त्यांच्यामुळेच ' कशी चालते , कसे कष्ट करतात 'गरीब बिचारे' !!! यावर एक सेग्मेंट होऊदे "
( मला कधीतरी प्रश्न पडतो... आधी मुंबई चालायची नाही का? हे गरीब बिचारे!!! मग मराठी माणूस काय लोखंड वाला , लोधा चा पत्ता सांगतो का?हे कष्ट करतात.. आंम्ही काय गोट्या खेळतो का?)
पण सर्वात महत्वाची तय्यारी म्हणजे संपादकांची चालू होती... सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे " आजचे ठोक ठोक प्रश्न " .....
त्यांनी अनुभवावरून आधीच पक्का केलं ... " खल फटाक नक्की " मग त्यावर पुढचे सर्व...
" उगला जहर..., लोकशाहीचा खून, गरिबांवर अन्याय, ह्या देशात कुणीही कुठेही जाऊ शकतो, साधन संपत्तीची तोड फोड ,गुंड प्रवृत्ती पासून ते थेट अटक करा इथपर्यंत 'पंच' कसे मारायचे ह्याची उजळणी झाली... 'त्या' विचारांचे पाहुणे बोलावणे झाले..."
पण घात झाला...
अचानक " साहेबांनी" निर्णय बदला... दोन सेनापती एक मेकांशी बोलले... बिहार दिन नाही तर सांस्कृतिक कार्यक्रम , सुरवात महाराष्ट्र गीताने होईल , राजकीय stetments नाहीत ...या तहावर मान्यता झाली...
" शिट शिट "... संपादकांनी मूठ आपटली...
१५ तारखेचा फुल डे शो रद्द...
" यांच टायमिंग काय कळतच नाही... , आमच टायमिंग बदलून जात
पण हार मानायची नाही... चला ... नवीन सेग्मेंट घ्या.."
' साहेब घाबरले? . मराठी अस्मिता कुठे गेली, आता मराठी माणसाच काय होणार, आर्थिक बोलणी झाली का, पासून ते थेट राडा केलं असता तरच महाराष्ट्र वाचला असता.. आता नाही.. इथपर्यंत मजल गेली'
काल पर्यंत " अहिंसा, लोकशाही , एकात्मता... यावर थाप मारणारी मिडिया आता राडा होनेकोईच मंगता था ..या बाजूला गेली..."
आमचा तिकीट संपला होतं... नाटक छान झालं... डबल ढोलकी कशी वाजते याचा काय मस्त उदाहरण दिलाल. आमचा वेळ आणि पैसा वसूल... कोण म्हणतं IPL चालू असताना इतर काही चालत नाही...??
गान छान लागल होतं रेडिओवर... " कुच्छ तो मिडिया कहेगी... मिडिया का काम हे केहना..." reemix असेल बहुदा...
विराज काणेकर

No comments:
Post a Comment