Sunday, 7 October 2012

समाधान... story


समाधान...
- विराज काणेकर 

स्वप्नपूर्तीच समाधान काय असतं हे त्याला कळल होत... स्वप्नपूर्ती मात्र नाही झाली तर राहिलेली पोकळी हि त्याहून भयानक टोचणारी असते... हे तर त्याहून कळल होत..  स्वतः समाधानी  होऊ अगर नको होऊदे मात्र आपल्यावर प्रचंड अपेक्षा ठेवणारे डोळे समाधानी करता आले तर... त्यांच समाधान पाहून तरी आपल्याला होणारे दुसर्यांच्या  अपेक्षाभंग करण्याचे दु:ख तरी कमी होते... नेहमी अतृप्त राहणाऱ्या आणि तृप्तीची किंचित अशा नसणाऱ्या व्यक्तीला तृप्तीचे काही क्षणभंगुर तुषार पण हवे हवे असतात... 

मनोज घाडी ...
आज पुन्हा तो तापलेल्या उन्हात सिग्नल वर उभा होता ....माणसाचे हे विचित्र असते.. आपले जीवनात काय घडतंय ते लगेच तो समोर दिसणाऱ्या वातावरणाशी कम्पेर करतो.. सिग्नल च्या पलीकडे उभे राहून तो श्रीमंती ची स्पर्धा आणि वर्ग वारी पाहत होता ... जसे brand तसे लोक ओळखायचे..  मर्सिडीझ ते मारुती.. CEO ते ASST .Manager ...

'रस्ता पार करता येतो.. सिग्नल लागतो.. कितीही मोठा रहदारीचा रस्ता असुदे.. निमूट पणे  थांबतो.. बेफाम घोड्याला खचकन लगाम लावावा तसं...पण जीवनातले problems ?
त्यांना कोण थांबवेल...सर्व ताण तणाव पार करून पल्याड च्या आनंदाच्या समाधानाच्या बाजूला जात आलं तर.. पण छे.. नव नवीन समस्या  येत राहतात ... सोसाट्याने.. या गाड्या पळत आहेत तसेच..जुने प्रश्न .. तेही अडकून राहतात.. रस्त्यावर बंद पडलेल्या   मोठाल्या जुनाट भंगार ट्रक सारखे... मार्ग कसं काढावा..? ..'
गाड्या अजूनही सुसाट पळत आहेत.. १८० सेकन्दचा मोठा सिग्नल... इकडची लोक तुंबलेली...
खाच कान घोड्याचा गळा दाबावा.. आणि मग त्याची किंकाळी ऐकावी.. असा ब्रेक चा आवाज ... एक मरण प्राय चित्कार...
समोरच्या बाजूला एक कुत्रा गाडीखाली आलं होता... बेवारशी रस्त्यावरचा कुत्रा.. त्याला काय माहित माणूस नावाच्या दुसर्या प्राण्याने केलेले नियम. ... त्याने नीट पाहिलं  ... पहिलं चाक पूर्ण अंगावरून जाऊन चेंदा मेंदा झाला... आणि दुसर्या चाकाच्या खाली अडकून पडल होत धूड .. ड्रायवर ने ब्रेक लावला पण उशीर झाला... 
ती मोठी गाडी थांबल्या मुळे क्षण भर का होईन... मागच्या गाड्या हळू झाल्या... १५-२० सेकंद गाड्यांचा सोसाटा बराच कमी झाला... तेवढ्यातल्या तेवढ्यात पण लोक त्या बाजूला निघून गेले.. रस्ता क्रॉस करून.. त्या मेलेल्या कुत्य्र्याला पाहायला आणि थांबायला वेळ कुठे होता.. त्या ड्रायवर ने पुन्हा पाय दाबून गाडी भिरकावली..आतल्या साहेबला उशीर होत असेल.. लगेच पुन्हा तुंबलेल्या गाड्या पळू लागल्या.. 
 
मनोज रस्ता पार करून गेला नाही... सिग्नल च्या या बाजूला राहून तो ह्या सर्व वेगवान गोष्टी पाहत होता...
' नाही म्हटलं तरी... त्या कुत्र्याने क्षण भर  गाड्यांच प्रवाह थांबवला... नाहीतरी जगून काय करणार होतं... मरता मरता काहीतरी करून गेला.. क्षणिक का होईना... '
१८० सेकंद संपली... तो दुसर्या बाजूला आला... 
त्याची मंदावलेली थिजलेली विचारचक्र पुन्हा सुरु झाली... 

त्याने खिसा तपासला .. तपासण्यापेक्षा चाळला...
तसे थोडे गांधीवादी कागद निघाले..
जाताना एका मिठाई च्या दुकानात गेला..
पाव किलो ची काजू मिठाई मुद्दाम हून  घेतली.. 'माईला खूप आवडते... बोलत नसली म्हणून काय झालं.. मला कळत नाही का...'
आबांच्या फोटो साठी हार घेतला.. देवासमोर  ठेवायला नारळ घेतला..

चावीने त्याने घरच दार उघडल..
समोरच्या खाटेवर पडलेल्या माईने चाहूल घेतली 
थकवा आलेल्या चेहऱ्याने तिने मुलाकडे पाहिलं...
आज माईला पोराचा चेहरा बराच वेगळा वाटला.. तो नेहमीसारखा ताणलेला नव्हता..  उदास मुळीच नव्हता...
" माई नोकरी मिळाली बघ.."  मनोज ने शक्य तेवढ्या आनंदात सांगून टाकलं... 
माईला एकदम  जो आनंद झाला ... खूप दिवस या शब्दासाठी ती तहानलेली होती.. ती सर्व ताकद लाऊन उठून बसली.. थकवा पळून गेला... एकदन सुरकुत्यांची जागा पसरलेल्या हास्याने घेतली..  डोळे चकाकले .. हात सरसावले.. ते मनोजच्या गालावर येऊन थांबले..
 मनोज ते सर्व टिपत होता... डोळे भरून माईचे एक न एक हाव भाव तो पाहत होता... आतून सुखावत होता...  माईच्या उबदार हातानी त्याचे मन  थंडावले...
" अगं तो पलीकडच्या चाळीत रम्या नाही का... घोडक्यांचा .. त्याच्या मित्राच्या कंपनीत एक जागा होती..  आजच सर्व झाला.. आणि पगार पण बराय.. वर्षभरात permanent करतील.. .. यायला जायला  पास..."
" शंकरची कृपा रं... बोलली होती न तुला.. नक्की मिळल नोकरी.. शिवकवचाच काम लई कडक ..गुण येतोच .. आधी पेढे घेऊन ये बर्र.. मी दिवा लावते.."
माई भाबडे पणाने भडा भडा बोलत होती..  जणू हेच राहिला होतं..  आता मनोज चा संसार डोळे भरून पाहावा.. मनात होत.. पण असल्या आजार पानात नाही व्हायचं शक्य.. पण हे ऐकायला मिळतंय तेच देवाची कृपा.. आता नोकरी लागली न .. मग होईल सर्व ठीक... नोकरी लागली हे उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळतंय ... बस नको आता काही...  माईने आत जाऊन वाटीत तेल आणला आणि तांदूळ.. समोर आबांच्या फोटोला हार घालताना पाहून माईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं  ... मनोज ने नंतर देवाला पण नारळ , मिठाई ठेवली .. आणि एक तुकडा  माईला दिला आणि नमस्कार केला..
माईच्या प्रत्येक वागण्यातला समाधानी पणा त्याला जाणवत होता... कधी नाही ती माई आज उत्साहात  फिरत होती... भड भडून बोलत होती... 
हाच आनंद .. हाच समाधानी पणा पाहण्यासाठी तो गेली २ वर्ष वणवण फिरत होता... नोकरी ची बातमी द्यावी.. माईला खुश करावा.. घरच दारिद्र्य दूर करावं.. माईला उत्तम डॉक्टर कडून उपचार द्यावेत..
नुसती स्वप्न...
 माई काही दिवस काढेल आता.. माईच्या आजारपणाची जाणीव होती त्याला.. नेहमी ती अंथरुणात पडून असायची.. अगदी थोडी फिरायची.. आज मात्र ती संचार ल्यासारखी करत होती.. एकदम ताकद आणली कुठून माईने...देव जाणे... माणसाला समाधान  हव असत... हेच मी नाही देऊ शकलो..इतके दिवस ... पण आज कशी फुललीय.. मनोज मनातून पुन्हा पुन्हा फुलात होता.. कृत कृत्य ..
माई झोपेपर्यंत तो जागा होता...  शेवटी माई झोपल्य्वर तिच्या आनंदी चेहरयला मन भरून पाहून तो पण पहुडला...

४ दिवस होऊन गेले त्या दिवसाला..
माईच्या जळत्या चितेसमोर पाहत मनोज उभा होता... ' सुटली.. सुटली..' लोक बड बडत होती.... सुटली... माई सुटली.. एवढे दिवस अडकून होती... एक बातमी ऐकायला.. ४ दिवसात खूप खुश वाटली.. एकदम मस्त वाटायचं बघून तिला.. किती बोलायची.. शेजार्यापाजार्यांना पण सांगायची...
" लागली बर्र नोकरी ... घोर गेला हो जीवाचा"
नशीब.. जाता जाता तिला निदान समाधान  देऊ शकलो... काही क्षण का होईना.. ज्या साठी ती चे कान आसुसले होते.. ते तिने ऐकल..

बराच वेळ झाला.. घरातून आता बरेच जण निघून गेले.. माईच्या पणती समोर तो एकटा राहिला.. ..खूप वेळ त्या मंद पणती कडे पाहत तो बसला होता.. 
नंतर तो उठला... पत्र्याच दार लाऊन घेतलं.. रात्रीचे २-३ वाजले असतील.. 
सून सान रस्त्यावरून तो चालत होता... 
चालता चालता रेल्वे ट्रक वर आला.. रुळांवर बसून राहिला.. वरच्या  खिशातला कागद  प्लास्टिक च्या पिशवीत  गुंडाळून खालच्या खिशात ठेवला.. आणि डोळे बंद करून पडून राहिला..
माईचा समाधानी चेहरा आठवत ...

दुसर्या दिवसातल्या वर्तमानपत्रात ४ त्या पानावर खालच्या कोपर्यात बातमी होती..

" बेकारीला कंटाळून युवकाची रेल्वेखाली आत्महत्या - युवकाचे नाव मनोज घाडी " 

Saturday, 29 September 2012

मी रक्त वेताळ...


कथेचे नाव: मी रक्त वेताळ...
( मी हि कथा काही भागात पोस्ट करेन )
----- विराज काणेकर 
भाग १ 

तुम्ही ४-५ जण आहात... एका अंधार्या निर्जन जंगलात... एका अनोळखी जागेवर... आणि तुम्हाला हे हि माहित आहे.. कि तुमच्यातला एक जण DRACULA आहे .. रक्त पिणारा... तो/ती तुमच्यात बसलाय/ बसलीय .. कधीही तुमच्या नाजूक मानेत तीक्ष्ण दात खुपसून गरम रक्त पिण्यासाठी...
कोण असेल तो/ ती... कि स्वतः तुम्हीच... दात बघा तपासून...रक्त प्यावास वाटतय..? ...
अश्या वेळी तुम्ही कोणावर संशय घ्याल.... तुमचा अंदाज बरोबर येईल का? तुम्हाला जो वाटतो तो नसतोच... कारण होतं काय.. आपण त्या व्यक्तीला निरुपद्रवी , साधा समजतो... काय करणार बर हा? ( तुम्ही किती चित्रपट पाहिलेत, गोष्टी वाचलेत ... पण उपयोग काय? ) आणि बहुतेक वेळा अश्या व्यक्ती घात करतात...

शिवम कृष्णन ...
तो एक विचित्र लेखक होता .. विचित्र या साठी कि तो भयानक , भेसूर , भीती कोंडलेलं लिहायला त्याला एक वेगळा आनंद मिळायचा .. अनेक जन त्याच्या लेखनाला हिणवायचे.. पण असे अनेक जण पण होते कि ज्यांच्यासाठी तो एक ' क्लास' लेखक होता.. त्याला सुद्धा उगाच कृत्रिम लिहिलेले त्याला कधीच आवडले नाही... उगाच चित्र विचित्र आवाज, घाणेरडे चेहरे असं काहीच नाही.. एक वास्तववादी भीती... कोंडलेली.. पण व्यक्त न होणारी... जणू ती त्याने समोर पाहिलीय, अनुभवलीय ... बंद अंधार्या खोलीत अडकलेला माणूस कसं आक्रोश करेल.. तसा आक्रोश त्याच्या कथा  करायच्या.. या वेळी त्याला आणखी भयानक काहीतरी लिहायचं... आतापर्यंत न लिहिलेला.. जास्त भीतीदायक.. पण ते वास्तव वादी वाटलाच पाहिजे... त्या शिवाय मजा कशी येईल... ' काटा' कसा येईल.. हवाय हवाय.. आणखी विचित्र , भेसूर , अंगावर येणार वास्तव...
याच साठी तो 'इथे' आला होता... वास्तववादी भीतीच्या शोधात... एक नवीन कथा रचण्यासाठी... स्वतः घाबरून मग ती भीती लोकांवर लोटण्यासाठी... एक नवीन भयाण वास्तव शोधण्यासाठी...
तो जवळ आला... जवळ असणारी टोर्च मारून तो अंदाज घेऊ लागला... एक खोली वजा आसरा पाहून तो दबकत आत गेला...थोडावेळ विश्रांती घेऊन मग काम सुरु करावे असा विचार करून तो मेणबत्ती पेटून टेकला..." आलो रे रक्त वेताळा जरा टेकतो मग बोलूच..." स्वताशीच बोलत किचित हसत तो डोळे बंद करून पहुडला... जवळच्या अंधार्या कोपर्यात चमकणारे डोळे मात्र त्याच्याकडे पाहत होते..

सोपान...
आज जंगलात जास्तच उशीर झाला होता त्याला...लवकर जागेवर गेलं पाहिजे ... असं रात्री फिरणं खूप वाईट...ते पण या जंगलात.. कुणी पाहिलं तर..पण करणार काय ... पोट भरलं पाहिजे.. मग कितीही उशीर का होईना... लाकड तोडायची.. छोटं मोठ जनावर मिळता का ते बघायचं ... छोटाच मिळता म्हणा... मोठा कोण येतंय इथे... कधी नशीब फळफळल तर वेगळी गोष्ट... पण आज पावसाची रिप रिप आहे... अमावस्या पण आहे... शोधता शोधता रात्र झाली...
या वेळी ठिकाणी अश्या वेळी जाण टाळल पाहिजे घरी गेलाच पाहिजे होता इतक्यात ... पण भूक ... ती नाही राहू देत... पाउस वाढला तर ? वाढलाच आहे... रात्र गढीवर काढली पाहिजे... तीच गढी.. तो पावलं ओढत चालतोय... काहीतरी मिळेल आज... गढीवर हालचाल दिसतेय... या वेळी कोण असेल.. अंधुक ज्योत दिसतेय... भास.. कि...
तेवढ्यात ज्योतीच्या दिशेने एक अस्फुट किंचाळी काळोखाला चिरत आली आणि विरून गेली.. माणसाचा आवाज? सोपान चमकला... गढीच्या दिशेने तो धावत सुटला... हातातली काठी घेऊन.


अमृता आणि श्रीधर ...
ती तिच्या महत्वकान्क्षेसाठी आणि तो त्या महत्वकान्क्षांबरोबर येणाऱ्या संकटाना तोंड देण्यासाठी आणि पर्यायी तिच्यासाठी आला होता ...
अमृता मुझुमदार ला कमी वयात खूप पल्ला गाठायचा होता ..खूप पुढे जायचं होतं . त्यासाठी येणाऱ्या कोणत्याही challenge ला ती फेस करणार होती होती.. 'मीडिया मधलं करीअर असंच असत... वेळेची बंधन भेकडाना असतात... ' खरा पाहता तिला कसलच बंधन नको होत.. मुक्त घारीप्रमाणे भरारी मारायची आणि थेट धडक मारायची आपले भक्ष्य टिपायला ...यशस्वी होण्याचे तिचे नियम ती स्वतः बनवायची.. खरा पाहता जगाने घालून दिलेले नियम तोडणे हाच तिचा नियम होता ....'संकट आली कि साला घुसायच ... असं सिम्पल हिशोब. स्वतः ला सिद्ध करण्यासाठी वाटेल ते करतो तोच पुढे असतो... आज तिला स्वतःला प्रूव करण्याचा गोल्डन चान्स मिळाला होता.. त्याच साठी ही 'मिशन' तिने घेतली होती.. आज असं काही भयानक जगाला दाखवायचं.. कि लोक साले बघतच राहतील.. " भूत आत्मा म्हणे... सापडला तर बेस्ट...नसला तर मी आहेच.. अशी स्टोरी देणार कि बस.. रक्त वेताळ म्हणे .. चू*** पंदी साली " हातातली सिगारेट पायाखाली टाकत ती श्रीधरकडे वळून नेहेमीसारख तुच्छ गर्वांध बोलली...
त्याने ठेवणीतल हसू चेहऱ्यावर उमटवल .. श्रीधर ला तिच्या या स्वभावाची कल्पना होतीच... खर पाहता तिचा हाच मुक्त पणा तिला आवडायचा ... अश्याच सोबतीच्या शोधात होता  तो... कित्येक वर्ष..तिचा बेधडक पणा.. तिची रग...नेहमी हाच विचार , ' हा पक्षी आपलाच,आपल्याकडेच कैद असायला हवा असा पक्षी... '
 तिचा associate कम cameraman कम अंगरक्षक अश्या भूमिका निबाह्वाय्च्या होत्या त्याला... हा प्लॉट त्यानेच सजेस्ट केला होता... त्याच गावाजवळच्या जंगलातली ही गोष्ट... अनेक लोक बोलायचे... आजी सांगायची.. पण सर्व वेग वेगळे सांगायचे...प्रत्येकाच्या कथा वेगळ्या ... प्रत्येकाचे अनुभव वेगळे... पण एक गोष्ट. सर्वात common होती ... हेच कि त्या गोष्टी रक्त वेताळाच्या होत्या.. दुसर्यंवर सत्ता गाजवणारा रक्त पिऊन त्यांना आपलासा करणारा रक्त वेताळ ..लहानपणापासून श्रीधरला एक सुप्त आकर्षण होते त्याच्याविषयी... अद्भुत आदर वाटायचा त्याला.. आज संधी मिळाली होती... 'आज येणार तो... आणि नाही आला तर... तर काय show must go on ...
" श्री look ... what's there?"
अमृता त्याची तंद्री आणि टी- शर्ट खारकन खेचत त्या दिशेने पळाली सुद्धा...
तो तिच्यामागे सुटला.. नक्की काय झाले त्याला नाही कळले.. पण हातात पात चमकणारी काठी घेऊन लांब पळणारी एक आकृती. आणि त्यामागे अमृता ... 
"ओह god आज नक्की काहीतरी happening मिळणार... "

" तो" मुलगा ...
तो मुलगा अंधार्या रात्रीत भुकेला फिरत होता .. त्याला नाव नव्हते... आठवत नव्हते... फक्त शरीर होते.. शरीराची जाणीव होत होती..आणि भुकेची.. बाकी काहीच नाही.. सुन्न सर्व.. प्राणीच तो जणू.. डोक्यावर आघात झाल्याची जाणीव कळ देत होती.. आणि उंचावरून पडल्याची आठवण .. एवढेच नजरेसमोर होते.. खरं तर ते नको होते आठवायला... ते आठवले कि अंगभर वेदना व्हायच्या... पण पांढऱ्या कागदावरील काळा ठिपका दिसावा तास त्याच्या कोऱ्या मनावर ते उमटलं होतं.. खूप भूक.. आग डोंब ... 'काहीतरी शोधायला हवे.'.. नाहीतर पुन्हा पडेल तो.. आता मात्र पडला तर उठणारच नाही .. चालून चालून थकला  होता  तो.. समोर एक उंच दगड होतं... त्यावर चढून तो बसला ... आता नाही चालायचं..इथेच बसाव.. डोळे बंद होत होते... शक्ती संपत होती.. तेवढ्यात समोर काही हलत्या आकृत्या दिसल्या आणि एक निसटती किंचाळी... समोर दगडी घर. तिथे काही आकृत्या पळत होत्या.... मुलाने कोरडे पडलेले ओठ दाबले... अचानक त्याला तरतरी वाटू लागली... सर सर तो उतरला... खूप वेळाने त्याला कुणीतरी दिसलं होतं... आता तरी भूक भागेल... भागलीच पाहिजे... तो पुढे जाऊ लागला...

कृष्णन ने डोळे बंद केले... एक Power nap घेऊन फ्रेश व्हावे असं विचार करून त्याने टोर्च बाजूला उलटी ठेवलं.. . डोळे बंद केले पण कसली तरी अपशकुनी पाल त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागली.. 
कसले तरी चित्र विचित्र आकार डोळ्यासमोर नाचू लागले.. तो मोकळ्या मैदानात उभा होता... आणि त्याच्या पासून काही अंतरावर पुन्हा तोच उभा होता... पण लांब असणारा तो हात पसरून उभा होता...पाठमोरा आकाशाकडे बघत... पावसाची वाट बघावी असाच.. आणि खरच पाउस सुरु झाला... किती भयानक दृश्य.. आता पावसात हात लांब करून भिजणारा आणि तुषार झेलणारा तरुण.. हे तर सुंदर निसर्ग चित्र आहे. पण सुंदर निसर्ग चित्रात पाउस पाण्याचा असतो, रक्ताचा नाही... हो.. तो पाउस रक्ताचा होता.. लांबचा कृष्णन हात लांब करून ते रक्त तुषार पीत होता.. चातक पावसाचे थेंब पितो तसाच.. 
हा कृष्णन बैचेन झाला... काय दिसतंय हे... अचानक लांबचा कृष्णन वळला.. 
त्याचा तो अवतार पाहून या कृष्णन ची गाळण उडाली... हिरवे डोळे.. लांब दात ...पण तो दूर होता... जवळ आला तर..आणी तेच झालं... दूर चा कृष्णन आता जवळ येऊ लागला होता... हळू हळू चालत... या कृष्णन ला पळायचे होते... पण शक्य नव्हते... पुतळा झाला होता तो... फक्त समोर काय घडतंय ते पहायचं... हालचाल होतंच नव्हती... आता तो धावत येऊ लागला... जोरात आणखी जोरात... त्याचे लांब दात आसुसलेले दिसत होते.. हिरवे डोळे त्वेषाने फुलले होते.. संपूर्ण चेहऱ्यावरून रक्त ओघळत होते.. तो आता १० पावलांवर आलाय ... आता तो झेप मारणार... आणि खरच त्याने लांडग्या सारखी झेप मारली ... आता त्याची झडप पडणार इतक्यात...

कृष्णन खाडकन जागा झाला... प्रचंड खोकत होता... धाप लागली त्याला.. धाप ... खूप श्रम करून लागते तशी... त्याने पटकन बाजूच्या bag मध्ये हात घालून पंप काढला आणि तोंडाला लावला... नाहीतर आता जीव जायचाच... त्याला संपूर्ण शांत व्हायला वेळ लागला ... खूप भयाण जगातून ती आला होता... सर्व चित्र डोळ्यसमोर दिसत होत.. भासच तो.. स्वप्न..पण इतके भयाण...? नाहीतरी या असल्या अपशकुनी उदास भकास आणि कथित बाधित वास्तुकडून काय अपेक्षा ठेवणार ... खूप जड जड वाटत होत.. त्याला एक वेगळीच शंका आली.. त्याने पटकन शेविंग कीट मधला आरसा काढला ... त्यात पाहिलं... 'हुश... नॉर्मल .... नव्हते... त्याला लांब दात नव्हते... डोळेपण साधेच होते... " हे हे!!!... भीती माणसाकडून काय करून घेते? उगाच नसत्या शंका..." तो स्वताशीच हसत आरश्यात बघून बोलत होता... पण त्याचा हसणं थांबलं... डोक सुन्न झालं... आरश्यात त्याच्या मागील दरवाज्याकडील कोपर्यातल्या अंधारात दोन हिरवे डोळे चमकताना त्याने पाहिले .. म्हणजे ' तो" आलाय... खरच.. कि स्वप्न च ?.. नाही...हे खर घडतंय.. वास्तव आणि स्वप्न याची जाणीव कितीही म्हटलं तरी वेगळी असते... त्याचा हातातून आरसा पडला... खळ कन आवाज आला ... त्या आवाजाने ते डोळे लुकलुकले ... आणि जवळ जवळ येऊ लागले ... त्याच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली.. त्याच्या नकळत... संथ पाण्यात दगड पडावा तशी ती किंकाळी अंधारात कंपने निर्माण करत निघाली... पण ते डोळे जवळ येत होते गुरगुरत...

तेवढ्यात फट्कन आवाज आला... जोरात फटका दिल्याचा... डोळे सरकन बाजूला लटपटले... कुई कुई विव्हळण्याचा आवाज कोपर्यातल्या अंधारात निघून गेला..
कृष्णन समोर काय घडतेय हे फक्त पाहू शकत होता.. पुन्हा पुतळा झाल्यासारखा... सर्व इतक्या वेगाने घडले कि काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हते ..किंबहुना जमत नव्हते...
१-२ सेकंद गेले.. समोरच्या दरवाजातून एक काळी आकृती दिसत होती... तेवढ्यात वीज जोरदार चमकली... त्या प्रकाशात एक काळा कभिन्न देह त्याने पहिला.. हातात एक लांब काठी... पुढे धारदार पात असणारी... 

" कोण रं तिकड ?" सोपान करड्या आवाजात ओरडला... 
कृष्णन ने उलटी पडलेली टोर्च सरळ करून आधी स्वतःवर मग सोपान वर मारली...
" मम मी मी कृष्णन... शिवम कृष्णन ... लेखक आहे... या जागेचा इथल्या गोष्टींचा अभ्यास करायला आलोय.. इथे रक्त वेताळ राहतो म्हणे...."

सोपान ने डोळे बारीक केले..सोपान ने काठीवरची पकड घट्ट केली... 

त्यांना सकाळपर्यंत गोव्याला पोहचायचे होते... कसही... म्हणून कार ने ते दोघे निघाले.. गोवा रोड ब्लॉक झाला होता... मोठा अपघात झाला होता मध्ये.. पण त्यांना घाई होती... तिथे थांबून उपयोगाचे नव्हते.. गोवा रस्ता त्याला चांगलाच परिचयाचा होता रस्त्यातले अनेक Short cuts , आड गाव, आड वळणे त्याला चांगली माहिती होते... तसा 'तो' रस्ता रस्त्याजवळील जंगल.. तो... आणि त्याच्याशी जोडलेल्या गोष्टी त्याने ऐकल्या नव्हत्या असं नाही... पण आज दुसरा मार्ग नव्हताच... नाहीतर त्याने का निवडला असता ? त्याने गाडीचे स्टेअरिंग आणि द्विधा मन त्या रस्त्याच्या बाजूने वळवले... घाईत असलेल्या विज्ञान वादी मेंदूने भित्र्या भावूक हृदयला मागे टाकले... गाडी भरधाव सुटली... 'पुढे रस्ता खराब आहे... पण हाकायची गाडी... थांबायचं मुळीच नाही... थेट राजापूर फाटा गाठायचं.' भीती मेंदूपर्यंत नाही जात तो पर्यंत तो चांगला विचार करतो... 
कोकण झाला म्हणून काय सर्वच रम्य नसत... आता हीच वाट... असल्या रात्री किती अभद्र वाटतेय... जंगली भटक्या श्वापदांचे भेसूर आवाज... काळी घोंगडी तोंडावरून गच्च घ्यावी. तशी गुदमरवणारी काळी रात्र... एवढ्यात फाटा आला पाहिजे होता ... त्याने हळू ब्रेक वर दाब वाढवला ... ' समोर काहीतरी आहे.. कसलातरी प्राणी आहे... धूड आहे.. झाड आहे... काहीतरी आहे..मेलेला प्राणी वाटतोय ..गाडी ने उडवलं असेल .. बाजूने हळू हळू काढावी... ' त्या धुडाच्या जवळ गाडी आली ... त्याने त्यावर कटाक्ष टाकला... खूप भयंकर मोठा काळा दगड पडलाय जणू... 
पण भास झालं का? अचानक तो दगड ... ते धूड हललं... पटकन वळाल... जणू लहान मुलाने आधी लपून मग ' भो' करावा तसं... पण हे निरागस नव्हत... त्याचा मेंदू बधीर  होत होता... आणि हृदय भीतीने भरले ... ते धूड पूर्ण वळल त्याने ते पाहिले... अक्राळ विक्राळ ... आक्रमक... भयानक... त्या धूडाची नझर त्याने चुकवत accelerator दाबला... गाडी जोरात धक्का मारत पुढे झेपावली ..काही वर्तुळ चाक फिरला असेल नसेल.. त्याच क्षणी एक मोठा भाला त्याच्या डोक्यात तिरपा घुसला ...मेंदूचा खुर्दा करून आरपार... गाडी तशीच पुढे गेली .. आणि एका झाडावर आपटून 
खड्ड्यात कलंडली... गाडीतल सामान बाहेर फेकल गेलं...

'तो' मुलगा शुद्धीवर आलं... 'तो ' लांब पडला होता ... जोरदार धक्क्याने ... काय झाले होते ठाऊक नाही... म्हणजे आठवत नाही...पण काहीतरी भयान अकल्पित घडून गेले होते... त्याचे अंग रक्ताने माखले होते ... डोळे बंद केले कि समोर येत होत रक्त... एक विचित्र धूड... आणि अघटीत घडल्याची भावना...
अंधार्या रात्रीत भुकेला फिरत होता .. त्याला नाव नव्हते... आठवत नव्हते... फक्त शरीर होते.. शरीराची जाणीव होत होती..आणि भुकेची.. बाकी काहीच नाही.. सुन्न सर्व.. प्राणीच तो जणू.. डोक्यावर आघात झाल्याची जाणीव कळ देत होती.. आणि उंचावरून पडल्याची आठवण .. एवढेच नजरेसमोर होते.. खरं तर ते नको होते आठवायला... ते आठवले कि अंगभर वेदना व्हायच्या... पण पांढऱ्या कागदावरील काळा ठिपका दिसावा तास त्याच्या कोऱ्या मनावर ते उमटलं होतं.. खूप भूक.. आग डोंब ... 'काहीतरी शोधायला हवे.'.. नाहीतर पुन्हा पडेल तो.. आता मात्र पडला तर उठणारच नाही .. चालून चालून ठाकला होतं तो.. समोर एक उंच दगड होतं... त्यावर चढून तो बसला ... आता नाही इथेच बसाव.. डोळे बंद होत होते... शक्ती संपत होती.. तेवढ्यात समोर काही हलत्या आकृत्या दिसल्या आणि एक निसटती किंचाळी... समोर दगडी घर. तिथे काही आकृत्या पळत होत्या.... मुलाने कोरडे पडलेले ओठ दाबले... अचानक त्याला तरतरी वाटू लागली... सर सर तो उतरला... खूप वेळाने त्याला कुणीतरी दिसलं होतं... आता तरी भूक भागेल... भागलीच पाहिजे... तो पुढे जाऊ लागला...

अमृता एव्हाना त्या आकृतीमागे पोहचली होती ... एका दगडी वाड्याच्या दरवाज्याजवळ होती... हातातल्या मोबाईल टोर्च ने तिने आत प्रकाश टाकला.. आत एक तगडा इसम हातात कुर्हाड घेऊन उभा होता... त्याच्या समोर एक घाबरलेला माणूस खाली बसला होता... आणि पुढे कोपर्यात एक मरतुकडा कुत्रा ....ती थबकली..

अचानक पांढरा प्रकाश मागून आल्यावर सोपान आणखी सावध झाला.. त्याने कुर्हाडी वरील पकड घट्ट केली... आणि तो मागे वळला..त्या प्रकाशच्य दिशेने एक पाउल त्याने टाकले..डोळ्यात एक अंगार.. आणि रानटी , धिप्पाड शरीर पाहून कोणीही घाबरेल.. सोपान आणखी पुढे येणार ... तेवढ्यात आवाज आला " थांब... नाहीतर गोळी घालेन "....
अमृताच्या मागे श्री सोपानवर गन रोखून उभा होता...
२० पावला मागे असणाऱ्या दगडी कुंपणाच्या आड राहूनkhel 'तो' मुलगा आतल्या अंधुक सावल्या, स्पष्ट आवाज आणि नाचता प्रकाश पाहत होता... 

प्रत्येकाची कारणे वेगळी ....
नावे वेगळी...
व्यक्तिमत्व तर त्याहून वेगळी...
भूतकाळातील त्यांची विचित्र पार्श्वभूमी...
वर्तमानातील त्याचं एकत्र एकचं जागी येण...
आणि त्याहून अकल्पित भविष्य... ते सर्वांच सारख होता का? 

क्रमश:
अमृताने पटकन रेमोत हातात घेतला..
समोर एक सभ्य वाटेल असा माणूस बसलाय.. आणि हा गावकरी आदिवासी असावा.. केवळ   येण्याने हे थबकून गेलेत.. उगाच panic नको व्हायला.. नाहीतर भलतच  होईल.. 
"hey  relax.. आपण शांत होऊन बोलू शकतो का.. " परिस्थितीचा गांभीर्य ओळखून सर्व सामान्य पातळीवर आणण्यासाठी अमृता बोलत होती...
" खर आहे ... प्लीज तुम्ही... शांत व्हा... " कृष्णन हि सरसावला..

बंदूक रोखण्याची श्री ची इच्छा नव्हती... आणि तो ती खरच चालू शकला असता का? हा हि एक प्रश्न होता.. तपन त्या रानटी आदिवासी माणसाची नझर आणि त्याची कुर्हाडी वरची  पकड त्याला बंदूक सोडू देत नव्हती.. पण अमृता भलतीच धाडसी... तिने एकावेळी सोपान च्या  कुर्हडीवर आणि दुसर हात श्रीच्या बंदुकीवर ठेवत  खाली झुकवले..
दोघेही बरेच थंडावले... सोपान मागे सरकून खांबाला टेकून उभा राहिला.. त्याची नझर मात्र अमृतावर होती...

श्रीने बंदूक मागे कमरेला लावली.. पाठीवरच्या bags आणि हातातली केस खाली ठेवत तो जमिनीवर बसला.. थकून अंग टाकतात तसं ......

Saturday, 22 September 2012

माझा विठ्ठल... Management Guru....!!! Poem...

माझा विठ्ठल...

विठ्ठलाचे रूप किती सांगितसे...
वेगवेगळे भास सर्व बाजू...
कटीवरी हात... रूप Aggressive ..
ये रे संकटा .. मी उभा असे...
चेहर्य्वारी नांदे गूढ मंद स्मित ...
चिंता जरी विश्वाची... "stress -free " राहावे...
अंगावरी शोभे .. कुंडल , केयूर, कौस्तुभ...
Multi skills धडा देत असे...
येईल तो आपला... जात - धर्म कसला...
Integrity वेगळी ती काय असते..
करोडो भक्त.... वारीत नाचती...
dedication तुझ्याप्रती अतुल्य असे ...
परत जाताना.... उर्जा घेऊन जाती....
तुझे नाव घेत .. शक्ती वेगळी...
Motivation वेगळे दाखून द्यावे ...
तू कानडा राजा... अघोषित Leader तूच असे ...
गवसलास मला " management guru" .
विठ्ठला काही चुकले.. तर पोटी घाल....
--- विराज काणेकर

They Can’t see us.. either!!! Marathi horror story


They Can’t see us.. either!!!

Viraj Kanekar

आपल्या कल्पना किती वेगळ्या असतात.. स्वार्थी... स्वतः भोवतीच फिरणाऱ्या...
स्वतःच अस्तित्व मोठ मानणार्या .... किवा स्वतःच अस्तित्व मांडणाऱ्या... आपण आपल्या भोवतीच्या अनेक गोष्टींकडे लक्ष कुठे दिसतो..
दिसणाऱ्या , जाणवणार्या घटना, वस्तू , माणसं... आपण लक्ष देतो का? मग ज्या गोष्टी दिसत नाहीत.. त्यांना तुम्ही काय किंमत देणार... तुमच्या खूप चुकीच्या कल्पना असतात...
तुम्ही लोक स्वतःला खूप शहाणे समजतात.. तुमचा स्वतःवर जाम विश्वास असतो... पण सत्य समोर आल्यवर तुम्ही हडबडून जाता.....
दुसऱ्यांच अस्तित्व न मांडणाऱ्या व्यक्तीला स्वतःच अस्तित्व न जाणवल्यास मला नवल नाही वाटत... निदान आता तरी.. त्या घटनेचा अनुभव घेतल्यावर...

फोनच्या कर्ण कर्कश रिंग मुळे मी दचकलो पण लगेच उठलो..... मनातल्या मनात शिव्या घातल्या असत्या कुणीतरी ...साला...हे बरंय... आपण त्या फोन वर अलार्म लावायचा... आपण लवकर उठावे म्हणून... आणि झाला कि त्यालाच शिव्या घालायच्या... ( नाही झाला वेळेवर तरीही तेच करायचं) .... खूप विचित्र जीवन जगतो आपण.. विचित्र .. अनुत्तरीत... अनेक गोष्टी आपण का करतो.. याला काहीच लॉजिक नसते... मला नाही जमत असा जगायला.. मी खूप लोजिकली जगणारा माणूस आहे... म्हणून तर घेतला न.. Engineering ... पण बोललो न.. जग साला नॉन लॉजिकल आहे...

आज उठल्यावर जरा वेगळा वाटला... म्हणजे मीच तसा रात्री असतो लायब्ररीत ... रात्रभर अभ्यास करतो.. ३-४ ला डुलकी मारून तासाभरात पुन्हा अभ्यास... कॉलेज खूप मोठं आहे... लायब्ररी पण २४ तास... अभ्यासासाठी.. रात्री तसा मी एकता नसतोच..माझ्याबरोबर १-२ जन असतात अभ्यास करायला.... आणि एक नाईट शिफ्ट ला वाचमन कम पिउन कम लाइब्रारिअन... ... आज जरा शांतच होता... आज कुणीच नाही... कदाचित गेले असतील बाहेर फुकायला...ही काय टेबलावर पुस्तक पडलीत.. जाउदे.. येतील...मी उठलो.. टेबल बाजूला करून बाहेर डोकावलं.. पण पिउन पण जाग्यावर नव्हता... नाहीतर झोपलेला असतोच तो.. पण तोही नाही... जाउदे गेला असेल...
तसा मी घाबरत नाही... लहान आहे का मी... पुन्हा जागेवर येउन बसलो... पुस्तक उघडला...चाळल... पण लक्ष लागत नव्हत... उगाच एकटेपणाची एक अनामिक भीती...
छे छे.. भीती कशाला वाटून घ्यायची... लॉजिकल राहायचा...
आता येईल कुणीतरी... मग हा एकटेपणा जाईल...
पण काय मूर्ख आहेत... सर्व एकदम निघून जातात... असा कुणाला एकट सोडून जातात का... एवढ्या मोठ्या लाइब्ररित...
हुश्ह्ह... दरवाजा करकरला... आणि बंद झाला... मग खुर्ची खडखडली ... आले शिंपी काका.. मी आपला उगाचच ... जाउदे...
मी उगाच हाक मारली... " काय काका पुडी मारायला गेला होता काय... "...
उत्तरच नाही... झोपले कि काय ... कि ऐकलाच नाही...
मी उठलो... लायब्ररीच्या डेस्क वर जाण्यासाठी ... अरे डेस्क वर कुणीच नाही... .. डेस्कच्या पलीकडच्या मोठ्या कपाटामागे जाऊन बघितला... कदाचित पुस्तक काढायला गेले असतील... छे ... कुणीच नाही हो...
पण आवाज ऐकला होता मी... भासच तो.. घाबरायला काय झाले... होतात भास... नाहीतर हवेने वाजला असेल...
मी स्वताची समजूत घालत होतो... पण तेवढ्यात...
असला टरकलो मी...
हा भास नक्कीच नव्हता... कुणीतरी मी बसलो होतो त्या बाजूची खुर्ची हलवली... म्हणजे मी आवाज ऐकला... पाहिला नाही...
पण कस शक्य आहे.. .. आत तर कुणीच नव्हत.. मी पुन्हा आत गेलो... कुणीच नाही... पण उगाच असे वाटले.. त्या टेबलावरचे पुस्तक कुणीतरी उघडले का... चल रे... काहीतरी...
कोण उघडणार.... कोण आहे इथे... भूत?? .. छे छे... असा काही असता का? illogical... भूत वगैरे काही असता का... आणि माझ्यासारख्या माणसाने विश्वास ठेवावा?
पण तास माझ काहीच चुकला नाही... सामान्य माणसाला एकटे पणात भीती वाटते ती भूताचीच... असा मी नाही .. एक psychology च्या पेपर मध्ये होता... म्हणजे हे पण लॉजिकल आहे...
आणि म्हणे भूत... हट ... मी झटकून टाकली भीती... पण झुरळ झटकून टाकता येत... जिवंत असत... भीती पण सजीव असते... पण कशाची वाटते... ते सजीव असते का..
मी विचार केला... जरा फ्रेश होऊन येऊ.. झोपेत असेल मी.. भास होत आहेत...
मी बाहेर निघालो... पण उगाच त्या पलीकडच्या खुर्चीकडे चोरट्या नजरेने पाहिले.. .. कुणी नव्हते.. पण असा वाटला कुणीतरी बसलंय...
कुणी दिसला नाही तेव्हा बर्र वाटला... .. भीती वाटली की माणसाला भास होतात... विचित्र भास.. आता हेच घ्या.. मला आता भास होत आहेत.. कि माझ्या आजू बाजूला कुणीतरी आहेत... आणि मला पाहत आहेत...
मी बाहेर आलो... जवळच रिफ्रेश रूम आहे.. आत गेल्यावर बेसिन वर तोंड धुवायला नळ चालू करणार.. तेवढ्यात दचकलो ... कुणीतरी toilet मध्ये आहे. हो.. कारण फ्लश केल्याचा आवाज ऐकला मी... असेल कुणीतरी... घाबरायचं काय... उलट बर्र वाटला पाहिजे.. आपण एकटे नाहीत... मी बाहेर आलो... पण तिथेच थांबलो... दडपण कमी होण्याऐवजी वाढले होते.. 'त्या ' फ्लश वाल्याची वात बघत थांबलो... रिफ्रेश रूम चा मेन दरवाजा उघडा ठेवला.. १० मीन झाली कुणीच येईना.. मी जरा घाबरत आत गेलो पुन्हा...
आता खरच थंड झालो... toilet चा दरवाजा उघडाच होता... कस शक्य आहे.. मी तर पाहिला नाही कुणाला बाहेर जाताना.. ..
हा भास नक्की नाही... कुणीतरी आहे... कि कुणीच नाही...
कुणीतरी खेचताय माझी... नक्कीच... MTV बकरा असेल... जुनं करून कोण पाहत नाही .. म्हणून असा ' लाइव ' शो ठेवला असेल..
लायब्ररीचा दरवाजा खाडकन आदळला.. मी तसाच बाहेर पळत तिथे गेलो... पुन्हा कुणी नाही... दरवाजा हलत होता.. नुकताच कुणीतरी आत गेल्यासारखा... मी आत घुसलो.. पण पुन्हा तेच.. आत कुणीही नाही.. आता बस झाल...
मी तडकलो... साल्ला .... आता नाही सोडायचं...
मी तसाच तिरमिरीत बाहेर आलो... .. जोरात शिव्या घातल्या... ' साला भुक्कड भ** , भे*** , चू ** साले' बाहेर या.. काय साले लपून मजा घेताय... या समोर... एकेकाची *** '
पण कुणीच नाही...
आता मी खूप घाबरलोय... खरच... जीव जाईल... मला सारखे भास होत आहेत...
हे काय.. बाजूने कुणीतरी गेलाच.. हा काय...
ते बघ... तिथे कुणीतरी आता होता...
मी वेडा झालो होतो... इथून तिथे फिरत होतो.. धावत होतो...
माझ्यामागे सावल्या लागल्या होत्या.. मी त्या सावल्यांच्या मागे लागलो होतो.. भीती... दाटून राहिलेलेई भीती... एकदम बाहेर येत होती...
मी वेडा झालो होतो का... सारखे भास...
आता मी खरच गळून गेलो होतो... थकलो होतो... भीती कधी कधी एवढी वाढते... कि त्याचा पण थकवा येतो...
मी रडून पण बघितला... वाटत होता आता कुणीतरी येईल... आणि म्हणेल ... ' u r बकरा'
किवा .. हे एका स्वप्नासारखा असेल.. आता संपेल... आणि मग सर्व मस्त.. पण काहीच नाही...
जवळपास ६ वाजायला आले होते... आता वर्दळ वाढेल... कॉलेज उघडेल...
पण मी अडकलो होतो... त्या दुष्ट्स्वप्नात... जशी जशी सकाळी होत होती...
भास अजून वाढत होते... माझे सर्व कयास चुकत होते... खरच सकाळ होतेय का... कि मी अजून गडद अंधारात जात होतो...
सर्व जन बाजूने जात आहेत... पण मला दिसत नाहीत... धुरळा उडतोय.....
मला सुटका हवी होती...
ते बघा... हा भास नाही... हा मला दिसतोय ... हो.. अस्तित्व जाणवतंय... तो बघा... पळत जातोय .. गच्चीवर...
मी उठलो.. 'त्या' च्या मागे पळत सुटलो... ओरडत होतो... पण तो पळत होता.. तो पोहचला गच्चीवर...
मी मागून गेलो... .. गच्ची च्या लांबच्या कट्ट्यावर तो बसला होता... हातात एक पेपर... एकदम कट्ट्यावर ... पाय खाली सोडून... भीती नाही वाटत का याला...
याच कट्ट्यावरून.. उडी मारून जीव दिलेत किती मुलांनी... हा त्यातलाच असेल.. एक भूत.. यानेच हा सगळा डाव रचलाय...
काही कल्पना पण मन गार करणाऱ्या असतात... हा दिसतोय तो माणूस आहे का कि भूत आहे ..
पण निदान दिसतोय... नसेल भूत वाटतय ... मी त्याच्या जवळ गेलो.. मी जवळ गेल्याची चाहूल लागली त्याला...
" सवय घे करून आता... मला तर सांगणारे कुणीही नव्हते...मी एकटाच शिकलो.."
" काक्क्क काय बोलताय तुम्ही...ममं मी समजलो नाही..."
" अरे घण्टा बोलतोय... साला तू तर लकी आहेस.. तुझा काय मस्त फोटोसकट छापलंय , आपली बातमी ४ थ्या पानावर होती.."
माझा गोन्धालेला चेहरा पाहून त्याने समजवायला सुरवात केली... आणि पेपर माझ्या हातात सरकवला
तो बोलत होता ....मी थंड हाताने...त्याच्या हातातला पेपर घेतला...
" "अरे हाच तर लोचा आहे.. जिवंत माणसांला वाटत कि आपल्याला भूत दिसत नाही.. तसंच आपल्या भूतांच असतं... आपल्याला पण माणसे दिसत नाहीत... पण जस जिवंत माणसाला भुताचे भास होतात.. तसेच भुताला जिवंत माणसाचे भास होतात... पण दिसत नाहीत... जसे आपण त्यांच्या आजू बाजूला घुटमळत असतो .. तसे ते पण आपल्या आजूबाजूला घुटमळत असतात फक्त जाणीव क्वचित होते...एकदा आपल्या सभोवतालच्या जगाची सवय करून घ्यायची आणि लक्षात ठेवायचं.. THEY CAN'T SEE US EITHER"
मी वाचत होतो .
त्यात बातमी होती.. माझ्या नावाची फोटोसकट..
" दि. २६ जून .. अभ्यासाच्या अति ताणामुळे अभियांत्रिकी २ र्या वर्षातील तरुणाची कॉलेजच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या !!!"
मी सुरवातीलाच म्हटलं..
आपण आपल्या भोवतीच्या अनेक गोष्टींकडे लक्ष कुठे दिसतो..
दिसणाऱ्या , जाणवणार्या घटना, वस्तू , माणसं... आपण लक्ष देतो का? मग ज्या गोष्टी दिसत नाहीत.. त्यांना तुम्ही काय किंमत देणार... तुमच्या खूप चुकीच्या कल्पना असतात...
तुम्ही लोक स्वतःला खूप शहाणे समजतात.. तुमचा स्वतःवर जाम विश्वास असतो... पण सत्य समोर आल्यवर तुम्ही हडबडून जाता.....
............
दि. २७ जून...पान क्रमांक ५ - अभियांत्रिकी कॉलेज मध्ये रात्री विचित्र भास... अंधश्रद्धा, भास कि... भूत ?

Monday, 6 August 2012

ADD AS A FRIEND - Story by Viraj Kanekar ( 9867405764



ADD AS A FRIEND
-    Story by Viraj Kanekar ( 9867405764)
गोष्ट पहिली..
मी श्रीधर गावडे ... !!
आता मी सावरलोय... सावरलोय म्हणजे काय... तर adapt झालोय .. आलेल्या परिस्थितीला बदलेल्या स्थितीला... दुसर काय असतं आपल्या हातात...फक्त बदललेल्या परिस्थितीला बघायचं .. कधी थोडं .. कधी फार... पण त्या क्षणी बसलेला धक्का जबरदस्त होता... थंड धक्का.. थंडगार सुई पटकन टोचावी.. मेंदूत.... थंडगार सुई.. आधी डोक्यात टोचणारी मग थंड धक्का देणारी...

फेसबुक पण बोअर होत चाल्ल होतं .. काय ते दररोजच करणार...तेच तेच.. शेअर , लाईक , कमेंट... माणसांच्या आयुष्यात काहीतरी नवीन पाहिजे... दररोज ... विचित्र... सणसणीत....लोक पण विचित्र असतात.... मुलींच्या पोस्ट असल्या कि त्याला लाईक , कमेंट चा पाउस... गुरासारखा HMM HMMM करत  असतात ...  खोटे फोटो ठेवतात... खोटी माहिती... अगदी फेक account पण करतात... निर्बुद्ध लेकाचे ... सगळ फसवं... दिखाऊ...

हा हा हा... बघा ... तुम्ही पण फसलात...तुम्हाला वाटला असेल .. कि ह्या हुशार mature मुलाला हे ढोंग आवडत नाही. इथेच फसलात.. दिसत तसं नसत...समोर दिसला ते सत्य मानता ...अहो मी पण असाच आहे.. असाच म्हणजे वर च्या सारखा... कदाचित पावले पुढेच... मला ह्याच फसव्या दिखाऊ थोडक्यात 'virtual ' जगात जगायला आवडत.. आता फेसबुक  जग फसवं आहे...आणि आपण खर रहाव म्हणजे घोर फसवणूक आहे... आणि समजा.. जर मी दाखवलं असत.. माझ खर रूप. म्हणजे खर शिक्षण, खरा फोटो.. खरी माहिती... तर कुणी विचारल असत का? ( कुणी म्हणजे विशेषतः मुलीनी) आता खरा  फेमस आहे ... जग खोत असाल म्हणून काय झालं...?
 मग मी मस्त छान फोटो शोधला. खोट्या माहितीने account सजवलं.. मग मी एका " अप्पर" क्लास मध्ये जाऊन पोहचलो .. या दरिद्री मध्यमवर्गात, काळ्या रंगात, साध्या कॉलेज अश्या lifestyle     
मध्ये मला जे मिळायची सुतराम अपेक्षा  नव्हती  ते मला या खोट्या जगात - १९ इंचाच्या box मध्ये आणि १०८ बटणाच्या जगात सापडले... अनेक चांगले मित्र ( त्याहून छान मैत्रिणी) माझ्या लिस्ट मध्ये जमू लागले .. मजा यायची...  वास्तव जगातला अपमान, दुर्लक्ष, बापाचा मार, दुसर्यांचा पैसा.. पाहून वाटणारा... हेवा.. मग येणार frustration ... छे छे.. इथे काहीच नसत...
हे जग किती मस्त... मी एकटाच राजा... इथे मी राज्य करतो.. अनेकांशी गप्पा मारतो.. त्या दिवशी मज्जा आली ... आमच्या कोलेजची ... ती "वंतास" मुलगी.. हो तीच... ' मी म्हणजे किळस  ' अशी वाटणारी ... माझ्या फेसबुक च्या जगात ' जवळची' मैत्रीण बनलीय... " Lets Meet " म्हणते...  आता तुम्हीच सांगा.. मी भेटलो हिला तर फेफर येऊन पडेल... मूर्ख कुठली... मजाच आहे... ना.. हल्ली मी वास्तव जग कोणते हेच विसरलो आहे...  त्या बाहेच्या कुरूप जगात नकोच... २४ तास इथेच राहायचं .. खोट.. पण मनात हव तसं खर.. आपल्याला हव तसं खर .. आपल्याला हव ते नाव .. हव ते जग... हवा तो सोबती... हव ते शिक्षण ... कुणाच्या बापाची ( अगदी माझ्यापण ) हिम्मत नाही हात लावायची... मी इथेच राहायला लागलोय आता मरूदे च्यायला.. हेच बर्र.. रात्री झोप नाही यायची.. आता कारण मिळालंय.. अगदीच डोक दुखलं.. झोपच येत नसेल तर डॉक्टरने गोळ्या दिल्यात .. झोप पण ' कृत्रिम' झालीय आता.... 
पण हेच बघा .. म्हटलं ना... काहीतरी नवीन हव असतं...सणसणीत.. नवीन .. तेच तेच करून कंटाळा येतो... तेच झाला... या खोट्या जगाच्या तेच तेच पानाचा कंटाळा येऊ लागला मला... नवीन हव असता ...काय वेगळ करणार...

असाच विचार  करत hoto त्याच वेळी.. एक पोस्ट पाहिली मी...  वाईट होती बातमी...
वाशीच्या राजे शिंदे महाविद्यालायचे चार तरुण - तरुणी पोहायला गेले होते.. बुडून मेले म्हणे... 
नावे पण आली होती...  आणि RIP .. लिहिलं होतं...  डोक्यात विचार आला ...
अरेच्या .. ह्यांची पण फेसबुक account असणार... ती अनाथ होणार... कशी काय?
म्हणजे बघा... आज तुम्ही password टाकून तुमच account  उघडला... काम केलं बंद केलं...आता तुम्ही विचार करणार कि उद्या पुन्हा उघडायच..पण उद्या सकाळी तुम्ही मेलात... मग तुमचा फेसबुक कोण उघडणार...असंच राहता ते... झोंबी सारख... झोंबी.. धड मेला पण नाही... धड जिवंत नाही... मला आधी' झोंबी ' शब्दाची मजा वाटली मग कीव...  छे छे ... 'तुम्ही मेलात' ही काय तुमच्या फेसबुक ची काय चूक आहे... बिचार... त्याने किती आनंद दिला तुम्हाला.. नवीन जग दिला... आणि त्याला तुम्ही असं अर्ध्यावर सोडून दिलात... जरापण विचार नाही केलात? तुम्ही मेल्यावर त्या निष्पाप account  च काय होणार ? कोण ते उघडून बघणार.. कृतघ्न  आहात तुम्ही...
तेवढात एक वीज चमकली डोक्यात... वाह.. काय कड्डक आणि सणसणीत आहे... मी काय केलं... त्या मेलेल्या मुलांच्या बातमीतल नाव पाहिलं..
' सुबोध पाटील ' ... टाकला सर्च वर ... - सुबोध पाटील  आले... आता मेलेला सुबोध कसं ओळखायचा.. ?  नशीब सुबोध ने ' studying engineering from Raje-Shinde technical institute' टाकल  होतं ... केलं 'add as a friend '... कोणतरी ऐकेल तर  वेडा  म्हणेल... सणकी , विक्षिप्त...  पण मजा वाटली.. कुणी केलाय का असा...? आपल्याला वेगळं करायची हौसच आहे भारी... मग ते उरलेले तीन जणांना पण पाठवलं... किती विचित्र... अशी Friend  Request .. जी कधीच नाही Accept होणार ...  विचित्र वाटला.. पण आवडला.. काहीतरी जगावेगळ केल्याचा आनंद.. अद्भुत... 
आता नवीन नादच लागला...मी मेलेली लोक शोधू लागलो... पेपर वाच.. TV बघ..कोण मेलाय ते बघ... मग शोध त्याला... तरुण असला तर अजून छान... मला मेलेली लोक हवी होती...कोण नाही सापडला असा. तर मला चूक चुकल्यासारख वाटायचं...  स्मशानातला मांत्रिक जसा मुडदा येण्याची वाट पाहतो.. तसं झाल होत... मी फेसबुक चा मांत्रिक होतो .... मेलेल्या लोकांशी मैत्री करणारा... 

आता गम्मत सांगतो... धक्काच तो..
हल्ली काय झालाय काय माहित... तरुण मुलं मरत नाहीत... मेलेली फेसबुक वर भेटत नाहीत.. छे... कंटाळा आलं होतं... ...डॉक्टर पण वेडाच आहे... एक गोळी घे म्हणे... अरे मी अद्भुत जगाचा शोध घेणारा मांत्रिक आहे... आणि म्हणे एक गोळी...  हल्ली गोळ्या घेऊन पण झोप नाही येत..त्या दिवशी नुसताच बटन चाळे करत  होतो... तेवढ्यात एक notification  आली... धक्काच बसला... 
आधी वाटला गम्मत करताय कुणीतरी.. 
' subodh patil added you as friend " ... सुबोध पाटील...? अरे हा तोच का?. बुडून मेलेला.. नाही नाही.. कोणतरी वेगळं असेल.. पाटील नाही म्हटला तरी १० मध्ये एक सापडेल... पण... हे काय... कोलेज पण तेच..? साला कुणीतरी घेतोय का? पण नाही... हे माझा गुपित नाही कुणाला ठाऊक...
विचार करत होतो... तेवढ्यात आणखी.. - - -१२ - २० - ३६-५५ notification ... फटाफट वाढल्या... साला... भे***  अरे ही तीच पोर ना... मेलेली...
सर्व मेलेली माणसं माझी request accept कशी करत आहेत... भूत ... ? 
एक थंड शिरशिरी गेली मेंदूतून... 
अंग थंड पडत चालला होतं.. म्हटलं ... थंड सुई टोचली असं वाटला...
मला भीती वाटत होती... पण बाकी भावना गोठल्या होत्या... माझ्या लिस्ट मध्ये ६० मेलेली लोक आली होती...
माझे हात गोठले...
आणि त्या नंतर जे झालं... जे तुमच्याबरोबर झाल असत तर...
मेलाच असतं तुम्ही... मी म्हणून ठीक होतं... 
एक वेगळीच notification आली....
" you have been added to dead facebook" 
विचित्रच ना... डेड फेसबुक... ? कशाला बर... अरे मला जाउद्या..
हे काय... माझे बाकीचे जिवंत ६०० मित्र गायब झाले ...
फक्त ६३ जण.. होते... सर्व मेलेले... तेच ते... 
मी काय करतोय इथे... आहे काय हे...?

सुरवातीला हे जड गेला... पण तुम्हाला मी सुरवातीलाच म्हटला ?
आता मी सावरलोय... सावरलोय म्हणजे काय... तर adapt झालोय .. आलेल्या परिस्थितीला बदलेल्या स्थितीला... दुसर काय असतं आपल्या हातात....

गोष्ट दुसरी..
मी रफिक शेख..
मला वेगळी सवय लागलीय... मी मेलेल्या लोकांना add करतो...मजा येते..
काल ही बातमी पहिली... आणि मग सुचल .... मेल्या नंतर काय होत असेल फेसबुक account च ?
हा बघा हीच बातमी... 
" झोपेच्या  गोळ्या जास्त घेऊन श्रीधर गावडे नावाच्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू "