Wednesday, 18 April 2012

वितळलेले आईस क्रीम..मराठी कविता

जीवन म्हणजे काय हो....
एक आईस क्रीम.....
हातात मिळालेले असताना....
घट्ट असताना .....
नुकतंच उघडताना.....
जस असतं.... तसं नंतर राहत का हो....
अलगद वितळून जात....
आपल्या समोर....
आम्ही पाहत राहतो....
हातावरून ओघळणारे....
पण न सावरता येणारे ओघळ....
मग वाटतं....
आधीच खाल्लं असतं तर....एकटाच ....
.........मजा आली असती....
कुणाची वाट पाहत राहिलो....
कुणीतरी.... शेअर करावा माझ्या जिवनाच आईस क्रीम ....
माझ्या बरोबर....
वाट पाहता पाहता ....
जीवन वितळून जाते....
आधीच चाखायला हवे होते....
मनात वाटत राहते....
आईस क्रीम पुन्हा घेता येते...जीवन नाही....
म्हणजे अजून जीवन तरी विकत मिळत नाही....
वितळून जाते....
----------------------- विराज काणेकर

No comments:

Post a Comment