कुलकर्ण्यांचा फर्मास मिडास " टच " ....
मी काही चित्रपटाला जाणकार वगैरे नाही... मात्र चित्रपटाची आवड जपणारा आणि आवडलेल्या चित्रपटावर भर भरून बोलणारा मात्र आहे...
खूप कमी चित्रपट असतात ज्यांच्या विषयी फेसबुक वर रिकमांड करावा वाटत आणि त्याहून कमी चित्रपट असतात ज्या विषयी ब्लॉग लिहावा असं वाटतं...
खरा पाहता उमेश आणि गिरीश हे दोन मस्त कूक मराठी चित्रपटाना मिळालेत...वेगळा सिनेमा देणाऱ्या महेश मांजरेकर, नितीन देसाई आदी महान व्यक्तींच्या पंक्तीत कुलकर्णी जोडी आली.. आणि मराठी चित्रपताना छान तडका मिळणार ह्याची खात्री झाली. भंकस बाष्कळ विनोदी आणि माझं तुझं कुंकू पुसून विट आणणाऱ्या मराठी सिनेमाला कंटाळलेल्या मराठी माणसाला नक्कीच हा दिलासा आहे.
पारितोषिक, कला , गल्ला... हे तीन बिंदू जमवून त्रिकोण काढणारा हुशार... कारण हा त्रिकोण खूप कठीण आहे...
मात्र प्रेक्षकाच्या भावविश्वात समरस होऊन त्याची नाडी पकडली... कि हा बेत उत्तम जमून येतो असाच ह्यांनी दाखवून दिलंय..
मसाला हा चित्रपट खळखळून ओढून ताणून हसवणारा मुळीच नाही.. मात्र चेहर्या वरची स्मित रेषा ढळू न देता अंतर्मुख करतो हे मात्र निश्चित...
प्रामाणिक, धडपड्या गरीब माणसाची गोष्ट ... त्याचा प्रवास...... त्याचा भाव विश्व .... आणि त्यातली निखळता .... हे पाहून आपण समरस होतो.... त्याच्या प्रवासात आपण आपल्याला गुंतवत जातो... त्याच्या यशाने आपण आनंदतो... तो फसला की आपण नकळत हसतो... पण मनात हलकासा चटका लागतो... हे सर्व का होतं?? याच कारण दिग्दर्शकाने अगदी प्रामाणिक पणाने मांडलेलं विश्व... ते विश्व आपलं वाटण ह्यातच सर्व आलं...आणि ह्याचा क्रेडीट गोज टू....दिग्दर्शक संदेश कुलकर्णी कड्डक..
अभिनयाविषयी काय बोलणार... सर्व ग्रेट batsmen एकाच टीम कडून खेळावा असं प्रकार... दिलीप प्रभावळकर, डॉ.मोहन आघाशे, डॉ.श्रीराम लागू यांनी कमी ओवर्स मध्ये जबरदस्त फटकेबाजी केलीय.. अमृता सुभाष तर गोडच... गिरीश साहेबांबद्दल काय बोलावे... थेट ओपनिंग ते सामना जिंकवून देण्यापर्यंत ... तुफान खेळी... बाकी सर्व कलाकारांनी चोख काम केलंय... खास करून हृषीकेश जोशी...
entrepreneurship , business, management ... वगैरे प्रांतातल्या लोकांनी तर पहावाच...
चित्रपटाचा वेग २-३ गिअर मध्ये बरोब्बर चालतो... उगाच घिसाड घाई नाही... उगाच ' साचलेपण' नाही...
'देउळ' ची घंटा देशात वाजवल्यावर उत्तम कामगिरीची जबाब दारी मोठी नक्कीच असणार... मात्र ( देव करो आणि माझ्या तोंडात साखर पडो ) सलग दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याची '"मसालेदार" अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.. सामान्य वाटणारी कथा असामान्य केलीय ती यातल्या संवादांनी...
तेव्हा सर्व मराठी जनहो... हा चित्रपट पहाच... आणि तिकीट काढून पहा... "टोरंत आणि piracy " असला दरिद्रीपणा नवीन मराठी ( आणि दर्जेदार ) सिनेमाच्या बाबतीत करू नका... नाहीतर पुन्हा बोलू नका.. मराठीत चांगला बनवत नाहीत...
" ग्रामीण मराठी सिनेमा आणि शहरी मराठी सिनेमा --- असा भेदभाव दूर करणारा आणि खरा रसिक शोधणारा हा प्रामाणिक प्रयत्न आहे "
-------- विराज काणेकर
