समाधान...
- विराज काणेकर
स्वप्नपूर्तीच समाधान काय असतं हे त्याला कळल होत... स्वप्नपूर्ती मात्र नाही झाली तर राहिलेली पोकळी हि त्याहून भयानक टोचणारी असते... हे तर त्याहून कळल होत.. स्वतः समाधानी होऊ अगर नको होऊदे मात्र आपल्यावर प्रचंड अपेक्षा ठेवणारे डोळे समाधानी करता आले तर... त्यांच समाधान पाहून तरी आपल्याला होणारे दुसर्यांच्या अपेक्षाभंग करण्याचे दु:ख तरी कमी होते... नेहमी अतृप्त राहणाऱ्या आणि तृप्तीची किंचित अशा नसणाऱ्या व्यक्तीला तृप्तीचे काही क्षणभंगुर तुषार पण हवे हवे असतात...
मनोज घाडी ...
आज पुन्हा तो तापलेल्या उन्हात सिग्नल वर उभा होता ....माणसाचे हे विचित्र असते.. आपले जीवनात काय घडतंय ते लगेच तो समोर दिसणाऱ्या वातावरणाशी कम्पेर करतो.. सिग्नल च्या पलीकडे उभे राहून तो श्रीमंती ची स्पर्धा आणि वर्ग वारी पाहत होता ... जसे brand तसे लोक ओळखायचे.. मर्सिडीझ ते मारुती.. CEO ते ASST .Manager ...
'रस्ता पार करता येतो.. सिग्नल लागतो.. कितीही मोठा रहदारीचा रस्ता असुदे.. निमूट पणे थांबतो.. बेफाम घोड्याला खचकन लगाम लावावा तसं...पण जीवनातले problems ?
त्यांना कोण थांबवेल...सर्व ताण तणाव पार करून पल्याड च्या आनंदाच्या समाधानाच्या बाजूला जात आलं तर.. पण छे.. नव नवीन समस्या येत राहतात ... सोसाट्याने.. या गाड्या पळत आहेत तसेच..जुने प्रश्न .. तेही अडकून राहतात.. रस्त्यावर बंद पडलेल्या मोठाल्या जुनाट भंगार ट्रक सारखे... मार्ग कसं काढावा..? ..'
गाड्या अजूनही सुसाट पळत आहेत.. १८० सेकन्दचा मोठा सिग्नल... इकडची लोक तुंबलेली...
खाच कान घोड्याचा गळा दाबावा.. आणि मग त्याची किंकाळी ऐकावी.. असा ब्रेक चा आवाज ... एक मरण प्राय चित्कार...
समोरच्या बाजूला एक कुत्रा गाडीखाली आलं होता... बेवारशी रस्त्यावरचा कुत्रा.. त्याला काय माहित माणूस नावाच्या दुसर्या प्राण्याने केलेले नियम. ... त्याने नीट पाहिलं ... पहिलं चाक पूर्ण अंगावरून जाऊन चेंदा मेंदा झाला... आणि दुसर्या चाकाच्या खाली अडकून पडल होत धूड .. ड्रायवर ने ब्रेक लावला पण उशीर झाला...
ती मोठी गाडी थांबल्या मुळे क्षण भर का होईन... मागच्या गाड्या हळू झाल्या... १५-२० सेकंद गाड्यांचा सोसाटा बराच कमी झाला... तेवढ्यातल्या तेवढ्यात पण लोक त्या बाजूला निघून गेले.. रस्ता क्रॉस करून.. त्या मेलेल्या कुत्य्र्याला पाहायला आणि थांबायला वेळ कुठे होता.. त्या ड्रायवर ने पुन्हा पाय दाबून गाडी भिरकावली..आतल्या साहेबला उशीर होत असेल.. लगेच पुन्हा तुंबलेल्या गाड्या पळू लागल्या..
मनोज रस्ता पार करून गेला नाही... सिग्नल च्या या बाजूला राहून तो ह्या सर्व वेगवान गोष्टी पाहत होता...
' नाही म्हटलं तरी... त्या कुत्र्याने क्षण भर गाड्यांच प्रवाह थांबवला... नाहीतरी जगून काय करणार होतं... मरता मरता काहीतरी करून गेला.. क्षणिक का होईना... '
१८० सेकंद संपली... तो दुसर्या बाजूला आला...
त्याची मंदावलेली थिजलेली विचारचक्र पुन्हा सुरु झाली...
त्याने खिसा तपासला .. तपासण्यापेक्षा चाळला...
तसे थोडे गांधीवादी कागद निघाले..
जाताना एका मिठाई च्या दुकानात गेला..
पाव किलो ची काजू मिठाई मुद्दाम हून घेतली.. 'माईला खूप आवडते... बोलत नसली म्हणून काय झालं.. मला कळत नाही का...'
आबांच्या फोटो साठी हार घेतला.. देवासमोर ठेवायला नारळ घेतला..
चावीने त्याने घरच दार उघडल..
समोरच्या खाटेवर पडलेल्या माईने चाहूल घेतली
थकवा आलेल्या चेहऱ्याने तिने मुलाकडे पाहिलं...
आज माईला पोराचा चेहरा बराच वेगळा वाटला.. तो नेहमीसारखा ताणलेला नव्हता.. उदास मुळीच नव्हता...
" माई नोकरी मिळाली बघ.." मनोज ने शक्य तेवढ्या आनंदात सांगून टाकलं...
माईला एकदम जो आनंद झाला ... खूप दिवस या शब्दासाठी ती तहानलेली होती.. ती सर्व ताकद लाऊन उठून बसली.. थकवा पळून गेला... एकदन सुरकुत्यांची जागा पसरलेल्या हास्याने घेतली.. डोळे चकाकले .. हात सरसावले.. ते मनोजच्या गालावर येऊन थांबले..
मनोज ते सर्व टिपत होता... डोळे भरून माईचे एक न एक हाव भाव तो पाहत होता... आतून सुखावत होता... माईच्या उबदार हातानी त्याचे मन थंडावले...
" अगं तो पलीकडच्या चाळीत रम्या नाही का... घोडक्यांचा .. त्याच्या मित्राच्या कंपनीत एक जागा होती.. आजच सर्व झाला.. आणि पगार पण बराय.. वर्षभरात permanent करतील.. .. यायला जायला पास..."
" शंकरची कृपा रं... बोलली होती न तुला.. नक्की मिळल नोकरी.. शिवकवचाच काम लई कडक ..गुण येतोच .. आधी पेढे घेऊन ये बर्र.. मी दिवा लावते.."
माई भाबडे पणाने भडा भडा बोलत होती.. जणू हेच राहिला होतं.. आता मनोज चा संसार डोळे भरून पाहावा.. मनात होत.. पण असल्या आजार पानात नाही व्हायचं शक्य.. पण हे ऐकायला मिळतंय तेच देवाची कृपा.. आता नोकरी लागली न .. मग होईल सर्व ठीक... नोकरी लागली हे उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळतंय ... बस नको आता काही... माईने आत जाऊन वाटीत तेल आणला आणि तांदूळ.. समोर आबांच्या फोटोला हार घालताना पाहून माईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं ... मनोज ने नंतर देवाला पण नारळ , मिठाई ठेवली .. आणि एक तुकडा माईला दिला आणि नमस्कार केला..
माईच्या प्रत्येक वागण्यातला समाधानी पणा त्याला जाणवत होता... कधी नाही ती माई आज उत्साहात फिरत होती... भड भडून बोलत होती...
हाच आनंद .. हाच समाधानी पणा पाहण्यासाठी तो गेली २ वर्ष वणवण फिरत होता... नोकरी ची बातमी द्यावी.. माईला खुश करावा.. घरच दारिद्र्य दूर करावं.. माईला उत्तम डॉक्टर कडून उपचार द्यावेत..
नुसती स्वप्न...
माई काही दिवस काढेल आता.. माईच्या आजारपणाची जाणीव होती त्याला.. नेहमी ती अंथरुणात पडून असायची.. अगदी थोडी फिरायची.. आज मात्र ती संचार ल्यासारखी करत होती.. एकदम ताकद आणली कुठून माईने...देव जाणे... माणसाला समाधान हव असत... हेच मी नाही देऊ शकलो..इतके दिवस ... पण आज कशी फुललीय.. मनोज मनातून पुन्हा पुन्हा फुलात होता.. कृत कृत्य ..
माई झोपेपर्यंत तो जागा होता... शेवटी माई झोपल्य्वर तिच्या आनंदी चेहरयला मन भरून पाहून तो पण पहुडला...
४ दिवस होऊन गेले त्या दिवसाला..
माईच्या जळत्या चितेसमोर पाहत मनोज उभा होता... ' सुटली.. सुटली..' लोक बड बडत होती.... सुटली... माई सुटली.. एवढे दिवस अडकून होती... एक बातमी ऐकायला.. ४ दिवसात खूप खुश वाटली.. एकदम मस्त वाटायचं बघून तिला.. किती बोलायची.. शेजार्यापाजार्यांना पण सांगायची...
" लागली बर्र नोकरी ... घोर गेला हो जीवाचा"
नशीब.. जाता जाता तिला निदान समाधान देऊ शकलो... काही क्षण का होईना.. ज्या साठी ती चे कान आसुसले होते.. ते तिने ऐकल..
बराच वेळ झाला.. घरातून आता बरेच जण निघून गेले.. माईच्या पणती समोर तो एकटा राहिला.. ..खूप वेळ त्या मंद पणती कडे पाहत तो बसला होता..
नंतर तो उठला... पत्र्याच दार लाऊन घेतलं.. रात्रीचे २-३ वाजले असतील..
सून सान रस्त्यावरून तो चालत होता...
चालता चालता रेल्वे ट्रक वर आला.. रुळांवर बसून राहिला.. वरच्या खिशातला कागद प्लास्टिक च्या पिशवीत गुंडाळून खालच्या खिशात ठेवला.. आणि डोळे बंद करून पडून राहिला..
माईचा समाधानी चेहरा आठवत ...
दुसर्या दिवसातल्या वर्तमानपत्रात ४ त्या पानावर खालच्या कोपर्यात बातमी होती..
" बेकारीला कंटाळून युवकाची रेल्वेखाली आत्महत्या - युवकाचे नाव मनोज घाडी "

No comments:
Post a Comment