कथेचे नाव: मी रक्त वेताळ...
( मी हि कथा काही भागात पोस्ट करेन )
----- विराज काणेकर
भाग १
तुम्ही ४-५ जण आहात... एका अंधार्या निर्जन जंगलात... एका अनोळखी जागेवर... आणि तुम्हाला हे हि माहित आहे.. कि तुमच्यातला एक जण DRACULA आहे .. रक्त पिणारा... तो/ती तुमच्यात बसलाय/ बसलीय .. कधीही तुमच्या नाजूक मानेत तीक्ष्ण दात खुपसून गरम रक्त पिण्यासाठी...
कोण असेल तो/ ती... कि स्वतः तुम्हीच... दात बघा तपासून...रक्त प्यावास वाटतय..? ...
अश्या वेळी तुम्ही कोणावर संशय घ्याल.... तुमचा अंदाज बरोबर येईल का? तुम्हाला जो वाटतो तो नसतोच... कारण होतं काय.. आपण त्या व्यक्तीला निरुपद्रवी , साधा समजतो... काय करणार बर हा? ( तुम्ही किती चित्रपट पाहिलेत, गोष्टी वाचलेत ... पण उपयोग काय? ) आणि बहुतेक वेळा अश्या व्यक्ती घात करतात...
शिवम कृष्णन ...
तो एक विचित्र लेखक होता .. विचित्र या साठी कि तो भयानक , भेसूर , भीती कोंडलेलं लिहायला त्याला एक वेगळा आनंद मिळायचा .. अनेक जन त्याच्या लेखनाला हिणवायचे.. पण असे अनेक जण पण होते कि ज्यांच्यासाठी तो एक ' क्लास' लेखक होता.. त्याला सुद्धा उगाच कृत्रिम लिहिलेले त्याला कधीच आवडले नाही... उगाच चित्र विचित्र आवाज, घाणेरडे चेहरे असं काहीच नाही.. एक वास्तववादी भीती... कोंडलेली.. पण व्यक्त न होणारी... जणू ती त्याने समोर पाहिलीय, अनुभवलीय ... बंद अंधार्या खोलीत अडकलेला माणूस कसं आक्रोश करेल.. तसा आक्रोश त्याच्या कथा करायच्या.. या वेळी त्याला आणखी भयानक काहीतरी लिहायचं... आतापर्यंत न लिहिलेला.. जास्त भीतीदायक.. पण ते वास्तव वादी वाटलाच पाहिजे... त्या शिवाय मजा कशी येईल... ' काटा' कसा येईल.. हवाय हवाय.. आणखी विचित्र , भेसूर , अंगावर येणार वास्तव...
याच साठी तो 'इथे' आला होता... वास्तववादी भीतीच्या शोधात... एक नवीन कथा रचण्यासाठी... स्वतः घाबरून मग ती भीती लोकांवर लोटण्यासाठी... एक नवीन भयाण वास्तव शोधण्यासाठी...
तो जवळ आला... जवळ असणारी टोर्च मारून तो अंदाज घेऊ लागला... एक खोली वजा आसरा पाहून तो दबकत आत गेला...थोडावेळ विश्रांती घेऊन मग काम सुरु करावे असा विचार करून तो मेणबत्ती पेटून टेकला..." आलो रे रक्त वेताळा जरा टेकतो मग बोलूच..." स्वताशीच बोलत किचित हसत तो डोळे बंद करून पहुडला... जवळच्या अंधार्या कोपर्यात चमकणारे डोळे मात्र त्याच्याकडे पाहत होते..
सोपान...
आज जंगलात जास्तच उशीर झाला होता त्याला...लवकर जागेवर गेलं पाहिजे ... असं रात्री फिरणं खूप वाईट...ते पण या जंगलात.. कुणी पाहिलं तर..पण करणार काय ... पोट भरलं पाहिजे.. मग कितीही उशीर का होईना... लाकड तोडायची.. छोटं मोठ जनावर मिळता का ते बघायचं ... छोटाच मिळता म्हणा... मोठा कोण येतंय इथे... कधी नशीब फळफळल तर वेगळी गोष्ट... पण आज पावसाची रिप रिप आहे... अमावस्या पण आहे... शोधता शोधता रात्र झाली...
या वेळी ठिकाणी अश्या वेळी जाण टाळल पाहिजे घरी गेलाच पाहिजे होता इतक्यात ... पण भूक ... ती नाही राहू देत... पाउस वाढला तर ? वाढलाच आहे... रात्र गढीवर काढली पाहिजे... तीच गढी.. तो पावलं ओढत चालतोय... काहीतरी मिळेल आज... गढीवर हालचाल दिसतेय... या वेळी कोण असेल.. अंधुक ज्योत दिसतेय... भास.. कि...
तेवढ्यात ज्योतीच्या दिशेने एक अस्फुट किंचाळी काळोखाला चिरत आली आणि विरून गेली.. माणसाचा आवाज? सोपान चमकला... गढीच्या दिशेने तो धावत सुटला... हातातली काठी घेऊन.
कोण असेल तो/ ती... कि स्वतः तुम्हीच... दात बघा तपासून...रक्त प्यावास वाटतय..? ...
अश्या वेळी तुम्ही कोणावर संशय घ्याल.... तुमचा अंदाज बरोबर येईल का? तुम्हाला जो वाटतो तो नसतोच... कारण होतं काय.. आपण त्या व्यक्तीला निरुपद्रवी , साधा समजतो... काय करणार बर हा? ( तुम्ही किती चित्रपट पाहिलेत, गोष्टी वाचलेत ... पण उपयोग काय? ) आणि बहुतेक वेळा अश्या व्यक्ती घात करतात...
शिवम कृष्णन ...
तो एक विचित्र लेखक होता .. विचित्र या साठी कि तो भयानक , भेसूर , भीती कोंडलेलं लिहायला त्याला एक वेगळा आनंद मिळायचा .. अनेक जन त्याच्या लेखनाला हिणवायचे.. पण असे अनेक जण पण होते कि ज्यांच्यासाठी तो एक ' क्लास' लेखक होता.. त्याला सुद्धा उगाच कृत्रिम लिहिलेले त्याला कधीच आवडले नाही... उगाच चित्र विचित्र आवाज, घाणेरडे चेहरे असं काहीच नाही.. एक वास्तववादी भीती... कोंडलेली.. पण व्यक्त न होणारी... जणू ती त्याने समोर पाहिलीय, अनुभवलीय ... बंद अंधार्या खोलीत अडकलेला माणूस कसं आक्रोश करेल.. तसा आक्रोश त्याच्या कथा करायच्या.. या वेळी त्याला आणखी भयानक काहीतरी लिहायचं... आतापर्यंत न लिहिलेला.. जास्त भीतीदायक.. पण ते वास्तव वादी वाटलाच पाहिजे... त्या शिवाय मजा कशी येईल... ' काटा' कसा येईल.. हवाय हवाय.. आणखी विचित्र , भेसूर , अंगावर येणार वास्तव...
याच साठी तो 'इथे' आला होता... वास्तववादी भीतीच्या शोधात... एक नवीन कथा रचण्यासाठी... स्वतः घाबरून मग ती भीती लोकांवर लोटण्यासाठी... एक नवीन भयाण वास्तव शोधण्यासाठी...
तो जवळ आला... जवळ असणारी टोर्च मारून तो अंदाज घेऊ लागला... एक खोली वजा आसरा पाहून तो दबकत आत गेला...थोडावेळ विश्रांती घेऊन मग काम सुरु करावे असा विचार करून तो मेणबत्ती पेटून टेकला..." आलो रे रक्त वेताळा जरा टेकतो मग बोलूच..." स्वताशीच बोलत किचित हसत तो डोळे बंद करून पहुडला... जवळच्या अंधार्या कोपर्यात चमकणारे डोळे मात्र त्याच्याकडे पाहत होते..
सोपान...
आज जंगलात जास्तच उशीर झाला होता त्याला...लवकर जागेवर गेलं पाहिजे ... असं रात्री फिरणं खूप वाईट...ते पण या जंगलात.. कुणी पाहिलं तर..पण करणार काय ... पोट भरलं पाहिजे.. मग कितीही उशीर का होईना... लाकड तोडायची.. छोटं मोठ जनावर मिळता का ते बघायचं ... छोटाच मिळता म्हणा... मोठा कोण येतंय इथे... कधी नशीब फळफळल तर वेगळी गोष्ट... पण आज पावसाची रिप रिप आहे... अमावस्या पण आहे... शोधता शोधता रात्र झाली...
या वेळी ठिकाणी अश्या वेळी जाण टाळल पाहिजे घरी गेलाच पाहिजे होता इतक्यात ... पण भूक ... ती नाही राहू देत... पाउस वाढला तर ? वाढलाच आहे... रात्र गढीवर काढली पाहिजे... तीच गढी.. तो पावलं ओढत चालतोय... काहीतरी मिळेल आज... गढीवर हालचाल दिसतेय... या वेळी कोण असेल.. अंधुक ज्योत दिसतेय... भास.. कि...
तेवढ्यात ज्योतीच्या दिशेने एक अस्फुट किंचाळी काळोखाला चिरत आली आणि विरून गेली.. माणसाचा आवाज? सोपान चमकला... गढीच्या दिशेने तो धावत सुटला... हातातली काठी घेऊन.
अमृता आणि श्रीधर ...
ती तिच्या महत्वकान्क्षेसाठी आणि तो त्या महत्वकान्क्षांबरोबर येणाऱ्या संकटाना तोंड देण्यासाठी आणि पर्यायी तिच्यासाठी आला होता ...
अमृता मुझुमदार ला कमी वयात खूप पल्ला गाठायचा होता ..खूप पुढे जायचं होतं . त्यासाठी येणाऱ्या कोणत्याही challenge ला ती फेस करणार होती होती.. 'मीडिया मधलं करीअर असंच असत... वेळेची बंधन भेकडाना असतात... ' खरा पाहता तिला कसलच बंधन नको होत.. मुक्त घारीप्रमाणे भरारी मारायची आणि थेट धडक मारायची आपले भक्ष्य टिपायला ...यशस्वी होण्याचे तिचे नियम ती स्वतः बनवायची.. खरा पाहता जगाने घालून दिलेले नियम तोडणे हाच तिचा नियम होता ....'संकट आली कि साला घुसायच ... असं सिम्पल हिशोब. स्वतः ला सिद्ध करण्यासाठी वाटेल ते करतो तोच पुढे असतो... आज तिला स्वतःला प्रूव करण्याचा गोल्डन चान्स मिळाला होता.. त्याच साठी ही 'मिशन' तिने घेतली होती.. आज असं काही भयानक जगाला दाखवायचं.. कि लोक साले बघतच राहतील.. " भूत आत्मा म्हणे... सापडला तर बेस्ट...नसला तर मी आहेच.. अशी स्टोरी देणार कि बस.. रक्त वेताळ म्हणे .. चू*** पंदी साली " हातातली सिगारेट पायाखाली टाकत ती श्रीधरकडे वळून नेहेमीसारख तुच्छ गर्वांध बोलली...
त्याने ठेवणीतल हसू चेहऱ्यावर उमटवल .. श्रीधर ला तिच्या या स्वभावाची कल्पना होतीच... खर पाहता तिचा हाच मुक्त पणा तिला आवडायचा ... अश्याच सोबतीच्या शोधात होता तो... कित्येक वर्ष..तिचा बेधडक पणा.. तिची रग...नेहमी हाच विचार , ' हा पक्षी आपलाच,आपल्याकडेच कैद असायला हवा असा पक्षी... '
तिचा associate कम cameraman कम अंगरक्षक अश्या भूमिका निबाह्वाय्च्या होत्या त्याला... हा प्लॉट त्यानेच सजेस्ट केला होता... त्याच गावाजवळच्या जंगलातली ही गोष्ट... अनेक लोक बोलायचे... आजी सांगायची.. पण सर्व वेग वेगळे सांगायचे...प्रत्येकाच्या कथा वेगळ्या ... प्रत्येकाचे अनुभव वेगळे... पण एक गोष्ट. सर्वात common होती ... हेच कि त्या गोष्टी रक्त वेताळाच्या होत्या.. दुसर्यंवर सत्ता गाजवणारा रक्त पिऊन त्यांना आपलासा करणारा रक्त वेताळ ..लहानपणापासून श्रीधरला एक सुप्त आकर्षण होते त्याच्याविषयी... अद्भुत आदर वाटायचा त्याला.. आज संधी मिळाली होती... 'आज येणार तो... आणि नाही आला तर... तर काय show must go on ...
" श्री look ... what's there?"
अमृता त्याची तंद्री आणि टी- शर्ट खारकन खेचत त्या दिशेने पळाली सुद्धा...
तो तिच्यामागे सुटला.. नक्की काय झाले त्याला नाही कळले.. पण हातात पात चमकणारी काठी घेऊन लांब पळणारी एक आकृती. आणि त्यामागे अमृता ...
"ओह god आज नक्की काहीतरी happening मिळणार... "
" तो" मुलगा ...
तो मुलगा अंधार्या रात्रीत भुकेला फिरत होता .. त्याला नाव नव्हते... आठवत नव्हते... फक्त शरीर होते.. शरीराची जाणीव होत होती..आणि भुकेची.. बाकी काहीच नाही.. सुन्न सर्व.. प्राणीच तो जणू.. डोक्यावर आघात झाल्याची जाणीव कळ देत होती.. आणि उंचावरून पडल्याची आठवण .. एवढेच नजरेसमोर होते.. खरं तर ते नको होते आठवायला... ते आठवले कि अंगभर वेदना व्हायच्या... पण पांढऱ्या कागदावरील काळा ठिपका दिसावा तास त्याच्या कोऱ्या मनावर ते उमटलं होतं.. खूप भूक.. आग डोंब ... 'काहीतरी शोधायला हवे.'.. नाहीतर पुन्हा पडेल तो.. आता मात्र पडला तर उठणारच नाही .. चालून चालून थकला होता तो.. समोर एक उंच दगड होतं... त्यावर चढून तो बसला ... आता नाही चालायचं..इथेच बसाव.. डोळे बंद होत होते... शक्ती संपत होती.. तेवढ्यात समोर काही हलत्या आकृत्या दिसल्या आणि एक निसटती किंचाळी... समोर दगडी घर. तिथे काही आकृत्या पळत होत्या.... मुलाने कोरडे पडलेले ओठ दाबले... अचानक त्याला तरतरी वाटू लागली... सर सर तो उतरला... खूप वेळाने त्याला कुणीतरी दिसलं होतं... आता तरी भूक भागेल... भागलीच पाहिजे... तो पुढे जाऊ लागला...
कृष्णन ने डोळे बंद केले... एक Power nap घेऊन फ्रेश व्हावे असं विचार करून त्याने टोर्च बाजूला उलटी ठेवलं.. . डोळे बंद केले पण कसली तरी अपशकुनी पाल त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागली..
कसले तरी चित्र विचित्र आकार डोळ्यासमोर नाचू लागले.. तो मोकळ्या मैदानात उभा होता... आणि त्याच्या पासून काही अंतरावर पुन्हा तोच उभा होता... पण लांब असणारा तो हात पसरून उभा होता...पाठमोरा आकाशाकडे बघत... पावसाची वाट बघावी असाच.. आणि खरच पाउस सुरु झाला... किती भयानक दृश्य.. आता पावसात हात लांब करून भिजणारा आणि तुषार झेलणारा तरुण.. हे तर सुंदर निसर्ग चित्र आहे. पण सुंदर निसर्ग चित्रात पाउस पाण्याचा असतो, रक्ताचा नाही... हो.. तो पाउस रक्ताचा होता.. लांबचा कृष्णन हात लांब करून ते रक्त तुषार पीत होता.. चातक पावसाचे थेंब पितो तसाच..
हा कृष्णन बैचेन झाला... काय दिसतंय हे... अचानक लांबचा कृष्णन वळला..
त्याचा तो अवतार पाहून या कृष्णन ची गाळण उडाली... हिरवे डोळे.. लांब दात ...पण तो दूर होता... जवळ आला तर..आणी तेच झालं... दूर चा कृष्णन आता जवळ येऊ लागला होता... हळू हळू चालत... या कृष्णन ला पळायचे होते... पण शक्य नव्हते... पुतळा झाला होता तो... फक्त समोर काय घडतंय ते पहायचं... हालचाल होतंच नव्हती... आता तो धावत येऊ लागला... जोरात आणखी जोरात... त्याचे लांब दात आसुसलेले दिसत होते.. हिरवे डोळे त्वेषाने फुलले होते.. संपूर्ण चेहऱ्यावरून रक्त ओघळत होते.. तो आता १० पावलांवर आलाय ... आता तो झेप मारणार... आणि खरच त्याने लांडग्या सारखी झेप मारली ... आता त्याची झडप पडणार इतक्यात...
कृष्णन खाडकन जागा झाला... प्रचंड खोकत होता... धाप लागली त्याला.. धाप ... खूप श्रम करून लागते तशी... त्याने पटकन बाजूच्या bag मध्ये हात घालून पंप काढला आणि तोंडाला लावला... नाहीतर आता जीव जायचाच... त्याला संपूर्ण शांत व्हायला वेळ लागला ... खूप भयाण जगातून ती आला होता... सर्व चित्र डोळ्यसमोर दिसत होत.. भासच तो.. स्वप्न..पण इतके भयाण...? नाहीतरी या असल्या अपशकुनी उदास भकास आणि कथित बाधित वास्तुकडून काय अपेक्षा ठेवणार ... खूप जड जड वाटत होत.. त्याला एक वेगळीच शंका आली.. त्याने पटकन शेविंग कीट मधला आरसा काढला ... त्यात पाहिलं... 'हुश... नॉर्मल .... नव्हते... त्याला लांब दात नव्हते... डोळेपण साधेच होते... " हे हे!!!... भीती माणसाकडून काय करून घेते? उगाच नसत्या शंका..." तो स्वताशीच हसत आरश्यात बघून बोलत होता... पण त्याचा हसणं थांबलं... डोक सुन्न झालं... आरश्यात त्याच्या मागील दरवाज्याकडील कोपर्यातल्या अंधारात दोन हिरवे डोळे चमकताना त्याने पाहिले .. म्हणजे ' तो" आलाय... खरच.. कि स्वप्न च ?.. नाही...हे खर घडतंय.. वास्तव आणि स्वप्न याची जाणीव कितीही म्हटलं तरी वेगळी असते... त्याचा हातातून आरसा पडला... खळ कन आवाज आला ... त्या आवाजाने ते डोळे लुकलुकले ... आणि जवळ जवळ येऊ लागले ... त्याच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली.. त्याच्या नकळत... संथ पाण्यात दगड पडावा तशी ती किंकाळी अंधारात कंपने निर्माण करत निघाली... पण ते डोळे जवळ येत होते गुरगुरत...
तेवढ्यात फट्कन आवाज आला... जोरात फटका दिल्याचा... डोळे सरकन बाजूला लटपटले... कुई कुई विव्हळण्याचा आवाज कोपर्यातल्या अंधारात निघून गेला..
कृष्णन समोर काय घडतेय हे फक्त पाहू शकत होता.. पुन्हा पुतळा झाल्यासारखा... सर्व इतक्या वेगाने घडले कि काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हते ..किंबहुना जमत नव्हते...
१-२ सेकंद गेले.. समोरच्या दरवाजातून एक काळी आकृती दिसत होती... तेवढ्यात वीज जोरदार चमकली... त्या प्रकाशात एक काळा कभिन्न देह त्याने पहिला.. हातात एक लांब काठी... पुढे धारदार पात असणारी...
" कोण रं तिकड ?" सोपान करड्या आवाजात ओरडला...
कृष्णन ने उलटी पडलेली टोर्च सरळ करून आधी स्वतःवर मग सोपान वर मारली...
" मम मी मी कृष्णन... शिवम कृष्णन ... लेखक आहे... या जागेचा इथल्या गोष्टींचा अभ्यास करायला आलोय.. इथे रक्त वेताळ राहतो म्हणे...."
सोपान ने डोळे बारीक केले..सोपान ने काठीवरची पकड घट्ट केली...
त्यांना सकाळपर्यंत गोव्याला पोहचायचे होते... कसही... म्हणून कार ने ते दोघे निघाले.. गोवा रोड ब्लॉक झाला होता... मोठा अपघात झाला होता मध्ये.. पण त्यांना घाई होती... तिथे थांबून उपयोगाचे नव्हते.. गोवा रस्ता त्याला चांगलाच परिचयाचा होता रस्त्यातले अनेक Short cuts , आड गाव, आड वळणे त्याला चांगली माहिती होते... तसा 'तो' रस्ता रस्त्याजवळील जंगल.. तो... आणि त्याच्याशी जोडलेल्या गोष्टी त्याने ऐकल्या नव्हत्या असं नाही... पण आज दुसरा मार्ग नव्हताच... नाहीतर त्याने का निवडला असता ? त्याने गाडीचे स्टेअरिंग आणि द्विधा मन त्या रस्त्याच्या बाजूने वळवले... घाईत असलेल्या विज्ञान वादी मेंदूने भित्र्या भावूक हृदयला मागे टाकले... गाडी भरधाव सुटली... 'पुढे रस्ता खराब आहे... पण हाकायची गाडी... थांबायचं मुळीच नाही... थेट राजापूर फाटा गाठायचं.' भीती मेंदूपर्यंत नाही जात तो पर्यंत तो चांगला विचार करतो...
कोकण झाला म्हणून काय सर्वच रम्य नसत... आता हीच वाट... असल्या रात्री किती अभद्र वाटतेय... जंगली भटक्या श्वापदांचे भेसूर आवाज... काळी घोंगडी तोंडावरून गच्च घ्यावी. तशी गुदमरवणारी काळी रात्र... एवढ्यात फाटा आला पाहिजे होता ... त्याने हळू ब्रेक वर दाब वाढवला ... ' समोर काहीतरी आहे.. कसलातरी प्राणी आहे... धूड आहे.. झाड आहे... काहीतरी आहे..मेलेला प्राणी वाटतोय ..गाडी ने उडवलं असेल .. बाजूने हळू हळू काढावी... ' त्या धुडाच्या जवळ गाडी आली ... त्याने त्यावर कटाक्ष टाकला... खूप भयंकर मोठा काळा दगड पडलाय जणू...
पण भास झालं का? अचानक तो दगड ... ते धूड हललं... पटकन वळाल... जणू लहान मुलाने आधी लपून मग ' भो' करावा तसं... पण हे निरागस नव्हत... त्याचा मेंदू बधीर होत होता... आणि हृदय भीतीने भरले ... ते धूड पूर्ण वळल त्याने ते पाहिले... अक्राळ विक्राळ ... आक्रमक... भयानक... त्या धूडाची नझर त्याने चुकवत accelerator दाबला... गाडी जोरात धक्का मारत पुढे झेपावली ..काही वर्तुळ चाक फिरला असेल नसेल.. त्याच क्षणी एक मोठा भाला त्याच्या डोक्यात तिरपा घुसला ...मेंदूचा खुर्दा करून आरपार... गाडी तशीच पुढे गेली .. आणि एका झाडावर आपटून
खड्ड्यात कलंडली... गाडीतल सामान बाहेर फेकल गेलं...
'तो' मुलगा शुद्धीवर आलं... 'तो ' लांब पडला होता ... जोरदार धक्क्याने ... काय झाले होते ठाऊक नाही... म्हणजे आठवत नाही...पण काहीतरी भयान अकल्पित घडून गेले होते... त्याचे अंग रक्ताने माखले होते ... डोळे बंद केले कि समोर येत होत रक्त... एक विचित्र धूड... आणि अघटीत घडल्याची भावना...
अंधार्या रात्रीत भुकेला फिरत होता .. त्याला नाव नव्हते... आठवत नव्हते... फक्त शरीर होते.. शरीराची जाणीव होत होती..आणि भुकेची.. बाकी काहीच नाही.. सुन्न सर्व.. प्राणीच तो जणू.. डोक्यावर आघात झाल्याची जाणीव कळ देत होती.. आणि उंचावरून पडल्याची आठवण .. एवढेच नजरेसमोर होते.. खरं तर ते नको होते आठवायला... ते आठवले कि अंगभर वेदना व्हायच्या... पण पांढऱ्या कागदावरील काळा ठिपका दिसावा तास त्याच्या कोऱ्या मनावर ते उमटलं होतं.. खूप भूक.. आग डोंब ... 'काहीतरी शोधायला हवे.'.. नाहीतर पुन्हा पडेल तो.. आता मात्र पडला तर उठणारच नाही .. चालून चालून ठाकला होतं तो.. समोर एक उंच दगड होतं... त्यावर चढून तो बसला ... आता नाही इथेच बसाव.. डोळे बंद होत होते... शक्ती संपत होती.. तेवढ्यात समोर काही हलत्या आकृत्या दिसल्या आणि एक निसटती किंचाळी... समोर दगडी घर. तिथे काही आकृत्या पळत होत्या.... मुलाने कोरडे पडलेले ओठ दाबले... अचानक त्याला तरतरी वाटू लागली... सर सर तो उतरला... खूप वेळाने त्याला कुणीतरी दिसलं होतं... आता तरी भूक भागेल... भागलीच पाहिजे... तो पुढे जाऊ लागला...
अमृता एव्हाना त्या आकृतीमागे पोहचली होती ... एका दगडी वाड्याच्या दरवाज्याजवळ होती... हातातल्या मोबाईल टोर्च ने तिने आत प्रकाश टाकला.. आत एक तगडा इसम हातात कुर्हाड घेऊन उभा होता... त्याच्या समोर एक घाबरलेला माणूस खाली बसला होता... आणि पुढे कोपर्यात एक मरतुकडा कुत्रा ....ती थबकली..
अचानक पांढरा प्रकाश मागून आल्यावर सोपान आणखी सावध झाला.. त्याने कुर्हाडी वरील पकड घट्ट केली... आणि तो मागे वळला..त्या प्रकाशच्य दिशेने एक पाउल त्याने टाकले..डोळ्यात एक अंगार.. आणि रानटी , धिप्पाड शरीर पाहून कोणीही घाबरेल.. सोपान आणखी पुढे येणार ... तेवढ्यात आवाज आला " थांब... नाहीतर गोळी घालेन "....
अमृताच्या मागे श्री सोपानवर गन रोखून उभा होता...
२० पावला मागे असणाऱ्या दगडी कुंपणाच्या आड राहूनkhel 'तो' मुलगा आतल्या अंधुक सावल्या, स्पष्ट आवाज आणि नाचता प्रकाश पाहत होता...
प्रत्येकाची कारणे वेगळी ....
नावे वेगळी...
व्यक्तिमत्व तर त्याहून वेगळी...
भूतकाळातील त्यांची विचित्र पार्श्वभूमी...
वर्तमानातील त्याचं एकत्र एकचं जागी येण...
आणि त्याहून अकल्पित भविष्य... ते सर्वांच सारख होता का?
क्रमश:
अमृताने पटकन रेमोत हातात घेतला..
समोर एक सभ्य वाटेल असा माणूस बसलाय.. आणि हा गावकरी आदिवासी असावा.. केवळ येण्याने हे थबकून गेलेत.. उगाच panic नको व्हायला.. नाहीतर भलतच होईल..
"hey relax.. आपण शांत होऊन बोलू शकतो का.. " परिस्थितीचा गांभीर्य ओळखून सर्व सामान्य पातळीवर आणण्यासाठी अमृता बोलत होती...
" खर आहे ... प्लीज तुम्ही... शांत व्हा... " कृष्णन हि सरसावला..
बंदूक रोखण्याची श्री ची इच्छा नव्हती... आणि तो ती खरच चालू शकला असता का? हा हि एक प्रश्न होता.. तपन त्या रानटी आदिवासी माणसाची नझर आणि त्याची कुर्हाडी वरची पकड त्याला बंदूक सोडू देत नव्हती.. पण अमृता भलतीच धाडसी... तिने एकावेळी सोपान च्या कुर्हडीवर आणि दुसर हात श्रीच्या बंदुकीवर ठेवत खाली झुकवले..
दोघेही बरेच थंडावले... सोपान मागे सरकून खांबाला टेकून उभा राहिला.. त्याची नझर मात्र अमृतावर होती...
श्रीने बंदूक मागे कमरेला लावली.. पाठीवरच्या bags आणि हातातली केस खाली ठेवत तो जमिनीवर बसला.. थकून अंग टाकतात तसं ......

next part kadhi story was awesome
ReplyDelete