Wednesday, 6 June 2012

ओले - सुके..!!! Marathi poem


आज सर्व ओले आहे... 
रस्ते... झाडे.. माणसे... 
मी पाहतोय... ओली झालेली माणसे... 
ओले असले ... तरी भिजलेले नाही...
फरक असतो...
मी हात बाहेर काढला... 
अंग ओले झाले तरी काहीतरी कोरडे राहिल्याची भावना अजून तीव्र झाली...
पाउस अंग ओले करतो... सुकलेले मन ओले करायला तू हवी होतीस...
--- विराज काणेकर 


No comments:

Post a Comment